• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • नाट्यगृह सुरू करण्याचा मुहूर्तही मिळाला, 'या' दिवशी वाजणार तिसरी घंटा!

नाट्यगृह सुरू करण्याचा मुहूर्तही मिळाला, 'या' दिवशी वाजणार तिसरी घंटा!

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद होते. पण आता शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरू करण्याच्या तयारी सरकारने...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद होते. पण आता शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरू करण्याच्या तयारी सरकारने...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद होते. पण आता शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरू करण्याच्या तयारी सरकारने...

 • Share this:
  मुंबई, 24 सप्टेंबर : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारापेठा शॉपिंग मॉल सुरू झाले आहे. नवरात्रीपासून आता मंदिरं सुद्धा सुरू होणार आहे. त्यापाठोपाठ आता नाट्यगृह सुद्धा सुरू केले जाणार आहे. जागतिक मराठी रंगभूमी दिनी (World Marathi Theater Day ) नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद होते. पण आता शाळा, मंदिरांपाठोपाठ नाट्यगृहही सुरू करण्याच्या तयारी सरकारने केली आहे. जागतिक मराठी रंगभूमी दिनी नाट्यगृह सुरू होणार आहे. त्यामुळे नाट्यकलाकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. चिनी कंपनीचं संतापजनक कृत्य; चिमुकल्यांच्या कपड्यांवर छापले भारतविरोधी मेसेज येत्या 5 नोव्हेंबरला जागतिक मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो.अनलॉक नंतर अनेक कलाकारांची नाट्यगृह सुरू करण्याची मागणी होती. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शक्यता धुसर होती. पण, आता राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे 5 नोव्हेंबरला नाट्यगृह सुरू केले जाणार आहे. नवरात्रीपासून मंदिरं सुरू दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 'दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल' असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. IPL 2021 : व्यंकटेश अय्यरने सौरभ गांगुलीमुळे बदलली स्टाइल; सांगितलं खास कारण 'धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये' असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
  Published by:sachin Salve
  First published: