The Zoya Factor : इंडियन क्रिकेट टीमसाठी सोनम ठरणार का लकी चार्म? पाहा Trailer

विनोदी ढंगातला झोया फॅक्टरचा हा ट्रेलर सर्वांनाच खळखळून हसवतो.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 04:41 PM IST

The Zoya Factor : इंडियन क्रिकेट टीमसाठी सोनम ठरणार का लकी चार्म? पाहा Trailer

मुंबई, 29 ऑगस्ट : अभिनेत्री सोनम कपूर आहुजाने (Sonam kapoor )एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यात ती क्रिकेट लक्ष्मीच्या अवतारात सोनम काय करतेय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. निळ्या नऊवारीत नटलेली ही देवी, एका हातात हेल्मेट, एका हातात क्रिकेटची बॅट आणि स्पोर्ट्स शूज अशा अवतारात दिसते आहे. सोनमच्या आगामी सिनेमासाठी हा अवतार तिने धारण केला आहे. द झोया फॅक्टर (The zoya factor) नावाचा हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याचं पहिलं motion poster गुरुवारी प्रसिद्ध झालं. या पोस्टरमध्ये सोनम क्रिकेट देवतेच्या अवतारात दिसते आहे. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

झोया नावाची एक मुलगी भारतीय क्रिकेट टीमने 1983 ला वर्ल्डकप जिंकल्याच्या दिवशी जन्माला येते. मात्र तिला क्रिकेटमध्ये अजिबात आवडत नसतं. बाकी सर्व बाबतीत अनलकी ठरणारी झोया भारतीय क्रिकेट टीमसाठी मात्र लकी ठरत जाते आणि मग जे काही होतं ते या ट्रेलर मध्ये पाहायला मिळतं. विनोदी ढंगातला हा ट्रेलर सर्वांनाच खळखळून हसवतो.

गावस्करांचा चाहता पण चर्चा मात्र खिलाडी कुमारची, भेटा अक्षयच्या 'जुळ्या' भावाला!

द झोया फॅक्टर या सिनेमात सोनमबरबोरच प्रसिद्ध मल्याळी अभिनेता दुलकर सलमान हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनमने स्वतःच्या Instagram अकाउंटवरून या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे होतं. भारताची 'लकी चार्म' असं तिने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.भारताची ही लकी चार्म असताना लिंबू-मिरचीची काय आवश्यकता आहे, असंही सोनमनं लिहिलं आहे.

Loading...

प्रसिद्ध अभिनेत्रीला रुममेटनं केली बेदम मारहाण, काचेच्या ग्लासनं चेहरा केला खराब

अभिषेक शर्मा दिग्दर्शित द झोया फॅक्टर हा सिनेमा 20 सप्टेंबरला रीलिज होणार आहे. The Zoya Factor मध्ये सोनमचा काका म्हणजे अभिनेता संजय कपूर तिच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. ती एका जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. ती भारतीय क्रिकेट टीमची लकी मॅस्कॉट कशी होते, याची ही कथा आहे.अनुजा चौहान यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. अंगद बेदी यात महत्त्वपूर्ण भूमिका करत आहे.

निकसोबत राहण्यासाठी प्रियांकाची धडपड, छेडछाड केलेला PHOTO VIRAL

सोनम ही आपल्यासाठी लकी चार्म असल्याचं वडील अनिल कपूर यांनी सांगितलं आहेच. आता ही क्रिकेट लक्ष्मीच्या रूपातली सोनम कुणा-कुणासाठी लकी चार्म ठरणार हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल.

===========================================================

SPECIAL REPORT: रानू यांच्या आवाजाने सलमानला अश्रू अनावर, केली 'ही' मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 04:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...