Home /News /entertainment /

हॉलिवूड गाजवणाऱ्या 'देसी गर्ल'चा हटके सिनेमा, ड्रायव्हरची रंजक कहाणी सांगणारा ट्रेलर प्रदर्शित

हॉलिवूड गाजवणाऱ्या 'देसी गर्ल'चा हटके सिनेमा, ड्रायव्हरची रंजक कहाणी सांगणारा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लवकरच एका हिंदी चित्रपटात झळकणार आहे. द व्हाइट टायगर (The White Tiger)चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे.

  मुंबई, 29 ऑक्टोबर: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)चा प्रवास सुस्साट सुरू आहे. हॉलिवूडमध्ये रमलेली प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये कधी दिसणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. तर ही देसी गर्ल आता लवकरच देसी अवतारात झळकणार आहे. राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि प्रियांका चोप्राचा द व्हाइट टायगर (The White Tiger) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. प्रियांका चोप्राने स्वत: इन्स्ट्राग्रामवर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव ही फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेता आदर्श गौरव (Adarsh Gourav) ही या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या सिनेमामध्ये प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव एआरआय (NRI) जोडप्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या आयुष्यात नोकर आणि ड्रायव्हर म्हणून आदर्श गौरवची एन्ट्री होते. असं दाखवण्यात आलं आहे. मग पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडतं ते जाणून घेण्यासाठी या चित्रपटाचा ट्रेलरच पाहायला हवा.
  द व्हाइट टायगर हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. 2008 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाने 40 वा बुकर अवॉर्ड जिंकला होता. द व्हाइट टायगर मध्ये गरिबी, धर्म, राजकारण आणि भ्रष्टाचारावर भाष्य केलं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood, Rajkumar rao

  पुढील बातम्या