सासरी जाणाऱ्या मुलीनं बनवलेला हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, आता काय करावं?

सासरी जाणाऱ्या मुलीनं बनवलेला हा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, आता काय करावं?

एक वधुने नवऱ्याच्या घरी जाताना गाडीतच टीकटॉक व्हिडिओ तयार केला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि कशाची चर्चा होईल काहीच सांगता येत नाही. सध्या टीकटॉकचे वेड अनेकांना लागलं आहे. सार्वजनिक ठिकाणीही व्हिडिओ तयार करण्याचं वेड यामुळं लागलं आहे. आपण कुठे आहोत आणि काय करतो याचंही अनेकदा भान नसतं. काहींना वाटतं की, लोकांचा कशाला विचार करायचा. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना किमान शिष्टाचार पाळायला हवेत असंही म्हटलं जातं.

बदलत्या काळानुसार रिती, परंपरा बदलल्या आहेत. त्या समाजानंसुद्धा स्वीकारल्या आहेत. पण आता एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. त्यात एक वधुने नवऱ्याच्या घरी जाताना गाडीतच टीकटॉक व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हि़डीओ तिनं तिच्या फेसबुकवर शेअर केला आहे. जुन्या परंपरांचं पालन करणाऱ्याला हे थोडं कठीणच वाटेल पण नवरीचा हा व्हिडिओ पाहून आता याला काय म्हणायचं असंच वाटेल. आई वडिलांचं घर सोडून पतीच्या घरी जाताना मुलीचे डोळे पाण्यानं भरलेले असतात. पण हा व्हिडिओ पाहिलात तर ही मुलगी नक्की सासरीच चालली आहे ना असा प्रश्न पडेल.

दबंग सलमानसोबतच्या नात्याबाबत कतरिना म्हणाली,जेव्हा मी संकटात असते...

सासरी जाताना अनेकदा मुलीला तिचं घर, माणसं मागे सोडून एका नव्या घरात, नव्या लोकांसोबत रहायचं असतं. त्याचं दडपणही असतं. पण या कोलकत्यातील नवरीचा व्हिडिओ पाहिला तर आता ते दडपणाचे, लाजायचे दिवस गेले असंच म्हणावं लागेल. अर्थात हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलं नाही पण नवरीचा हा असा अवतार पाहून हसावं की रडावं असाच प्रश्न पडत आहे.

जेव्हा न्यूड सीनमुळे राधिका आपटेचं बॉलिवूड करिअर आलं होतं धोक्यात...

'बरं झालं बाप्पाचा विचार बदलला, नाही तर त्यानं आपलंच केलं असतं विसर्जन'

===========================================

भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: September 7, 2019, 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading