मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य आलं समोर; करण, दीपिका, रणबीरसह अनेकांना मोठा दिलासा

बॉलिवूडच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य आलं समोर; करण, दीपिका, रणबीरसह अनेकांना मोठा दिलासा

या पार्टीत ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप केला जात होता

या पार्टीत ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप केला जात होता

या पार्टीत ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप केला जात होता

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 25 ऑक्टोबर : गेल्या अनेक महिन्यात बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाबाबत वारंवार मोठ मोठ्या बातमी समोर येत आहे. सुशांत सिंह मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासर्वात करण जोहरच्या घरात शूट केलेला एक व्हिडीओही चर्चेत आला होता. ज्यामध्ये विविध सेलिब्रिटी या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेकांनी करण जोहर याच्या घरात झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप केला जात होता. यावर अनेकदा करण जोहरने स्पष्टीकरणही दिलं आहे. मात्र याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या बॉलिवूड पार्टीच्या व्हायरल व्हिडीओची दुसरी फॉरेंसिक रिपोर्ट एनसीबीला मिळाली आहे. गुजरातच्या गांधींनगर FSL रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडीओमधील पांढऱ्या रंगाच्या इमेजला रिफ्लेक्शन ऑफ लाइट असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय या व्हिडीओमध्ये दुसरं काहीही दिसत नाही. व्हिडीओमध्ये ड्रग्ज सारखा कोणताही पदार्थ वा अन्य दिसले नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. मात्र या व्हिडीओमध्ये ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचे समोर आल्याने या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका टीव्ही अभिनेत्रीला रंगेहात पकडले आहे. ही अभिनेत्री ड्रग्ज घेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.  एनसीबीच्या मुंबई झोनल टीमने कारवाई केली आहे. याप्रकरणी एनसीबीकडून बराच माल ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच एनसीबीने धडक कारवाई करत एका पेडलरला देखील अटक केली आहे.
First published:

Tags: Karan Johar

पुढील बातम्या