• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अर्जुन रेड्डीमुळं रातोरात झाला सुपरस्टार; पाहा दानशुर विजयचा थक्क करणारा प्रवास

अर्जुन रेड्डीमुळं रातोरात झाला सुपरस्टार; पाहा दानशुर विजयचा थक्क करणारा प्रवास

रुपेरी पडद्यावर हिरोगीरी दाखवणारा विजय खऱ्या आयुष्यात देखील सुपरहिरो असल्याचं म्हटलं जातं. त्यानं आपल्या चाहत्यांच्या मदतीसाठी मिळालेले पुरस्कार देखील विकले होते.

 • Share this:
  मुंबई 9 मे: विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. अर्जुन रेड्डी (Arjun Reddy) या चित्रपटामुळं तो खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाला. आज त्याचा वाढदिवस आहे. 32 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रुपेरी पडद्यावर हिरोगीरी दाखवणारा विजय खऱ्या आयुष्यात देखील सुपरहिरो असल्याचं म्हटलं जातं. त्यानं आपल्या चाहत्यांच्या मदतीसाठी मिळालेले पुरस्कार देखील विकले होते. विजयचा जन्म 1989 साली आंध्रप्रदेशमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याला अभिनयाची आवड होती पण त्याच्या कुटुंबीयांचा त्यास विरोध होता. त्यानं इतरांप्रमाणे नोकरी करावी आणि सर्वसामान्य आयुष्य जगावं अशी त्यांची इच्छा होती. कारण सिनेसृष्टीतील लोक नैराश्येत जातात, त्यांना वाईट सवई असतात, त्यांचं आयुष्य कधीच स्थिरस्थावर नसतं, अन् मुळात म्हणजे ते कुटुंबीयांपासून फार दूर जातात अनं विजयच्या बाबतीतही असंच काहीसं घडेल अशी त्यांना भीती होती. परंतु कुटुंबीयांना न सांगता गुपचूप तो रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होता. अर्थात ही गोष्ट दिर्घकाळ लपून राहिली नाही. पण नोकरी करता करता अभिनय करण्यास त्याला परवानगी मिळाली. श्वेता तिवारीच्या पतीने घातला राडा; अभिनेत्रीवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO याच दरम्यान त्याला नुवविल्ला, लाईफ इज ब्युटिफुल, द्वारका यांसारख्या काही चित्रपटांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारायला मिळाल्या. अन् त्यानंतर 2017 मध्ये आला अर्जून रेड्डी. या चित्रपटानं त्याचं आयुष्य एकाएकी बदललं. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटानं रातोरात त्याला लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्य़ाचा पुरस्कार देखील मिळाला. शिवाय युरोप-अमेरिकेतही या चित्रपटासाठी त्याचं प्रचंड कौतुक करण्यात आलं. परंतु दोन वर्षांपूर्वी केरळमध्ये आलेल्या महापुरात अनेकांचं आयुष्य उध्वस्त झालं. अन् या लोकांना मदत करण्यासाठी विजयनं अर्जुन रेड्डीसाठी मिळालेले आपले सर्व पुरस्कार विकून टाकले. अन् त्यामधून आलेल्या पैशांनी त्यानं लोकांची मदत केली. याच दरम्यान त्यानं डिअर कॉम्रेट या चित्रपटासाठी करार केला होता. या चित्रपटासाठी मिळालेलं सर्व मानधन त्यानं महापुरामुळं उध्वस्त झालेल्या लोकांच्या पुर्नवसनासाठी दान केलं. त्याच्या या दानशुर प्रवृत्तीमुळंच आज त्याला रिअल लाईफ हिरो असं म्हटलं जातं. आज वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: