मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: खलनायिका कशी झाली विनोदी अभिनेत्री? पाहा उपासनाचा अनोखा प्रवास

HBD: खलनायिका कशी झाली विनोदी अभिनेत्री? पाहा उपासनाचा अनोखा प्रवास

46 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

46 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

46 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मुंबई 29 जून: द कपिल शर्मा शोमधून (The Kapil Sharma Show) घराघरात पोहोचलेली उपासना सिंग (Upasana Singh) ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं साकारलेली कपिल शर्माच्या आत्याची भूमिका तुफान गाजली होती. यामुळं अनेक चाहते तिला तिच्या खऱ्या नावाऐवजी आत्या म्हणूनच हाक मारु लागले होते. 28 जून रोजी उपासनाचा वाढदिवस आहे. (Upasana Singh birthday) 46 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विशाखा सुभेदार ठरली राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी; राज्यपालांच्या हस्ते झाला सन्मान

उपासनाचा जन्म 1974 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. सात वर्षांची असताना दुरदर्शनवरील एका मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारुन तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळत होती परंतु पालकांनी तिला अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला लावल्यामुळं पुढे मग तिनं काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला.

‘बिग बॉस’मध्ये झळकणार का? नेटकऱ्यांच्या चर्चेवर अखेर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन

शिक्षण पुर्ण झाल्यावर 1997 साली हनुमान या मालिकेतून तिनं पुनरागमन केलं. याच दरम्यान पाप की सजा, मै हू गीता, इन्साफ की देवी, आज की ताकत यांसारख्या काही बॉलिवूडपटांमध्ये देखील ती लहानमोठ्या भूमिका साकारत होती. सोनपरी या मालिकेमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. या मालिकेत तिनं साकारलेली खलनायिकेची भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. तेव्हापासून गेली दोन दशकं ती बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर कार्यरत आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Kapil sharma, The kapil sharma show