मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘कौतुक करतात पण काम देत नाही’; कश्मीरा करतेय बॉलिवूड सोडण्याचा विचार

‘कौतुक करतात पण काम देत नाही’; कश्मीरा करतेय बॉलिवूड सोडण्याचा विचार

स्वतःच्या आवडी निवडी काय आहेत? आपल्याला आयुष्य कसं जगायचे आहे? आपली मुल्य काय आहेत? हे ओळखा त्यांना महत्व द्या.

स्वतःच्या आवडी निवडी काय आहेत? आपल्याला आयुष्य कसं जगायचे आहे? आपली मुल्य काय आहेत? हे ओळखा त्यांना महत्व द्या.

सलमान खान, आमिर खानसोबत काम केलं तरी देखील कश्मीरा बेरोजगार

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 25 जुलै: कश्मीरा ईरानी (Kashmira Irani) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आहे. आमिर खान, सलमान खान यांसारख्या अनेक सुपरस्टारसोबत झळकलेली कश्मीरा गेलं एक दशक बॉलिवूडमध्ये काम करतेय. आज तिचा वाढदिवस आहे. (Kashmira Irani birthday) 32 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कश्मीरा आपल्या युनिक टाईमिंगसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील तिचे फॅनफॉलोइंग एखाद्या आघाडिच्या अभिनेत्रीला लाजवेल असं आहे. मात्र तरी देखील तिला अद्याप प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता ती बॉलिवूड सोडण्याचा विचार करतेय.

Pornography Case: राज कुंद्राच्या संकटात वाढ; पोलिसांच्या हाती लागली गुप्त तिजोरी

कश्मीराचा जन्म पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिने मॉडलिंग करत आपल्या करिअरची सुरुवात केली. याच दरम्यान ती प्रायोगिक नाटकांमध्ये देखील काम करत होती. तिचं अभिनय कौशल्य पाहून दिग्दर्शक भूषण पटेल प्रभावित झाले. त्यांनी कश्मीराला त्यांच्या अंबर धारा या मालिकेत काम करण्याची संधी दिली. मालिका दिर्घ काळ चालली नाही मात्र यामुळे टीव्ही इंडस्ट्रीचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले. त्यानंतर तिने सेव्हन आणि धर्मक्षेत्र या मालिकांमध्ये काम केलं.

गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने...’

मालिकांसोबतच तिला काही चित्रपटांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये पिके, टायगर अभी जिंदा है, रंगून, भारत यांसारख्या बिग बजेट चित्रपटांमध्ये ती झळकली. परंतु यामध्ये तिने सहाय्यक भूमिका साकारल्या. अर्थात तिच्या अभिनयाची अनेकदा समिक्षकांनी नोंद घेतली आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने माझं कौतुक खूप होतं पण म्हणावं तसं काम मिळतं नाही अशी तक्रार केली होती. या पार्श्वभूमिवर आता ती बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार करतेय.

First published:

Tags: Bollywood actress, Tv actress