एक बॅकग्राऊंड डान्सर कशी झाली लोकप्रिय अभिनेत्री? पाहा काजल अग्रवालचा थक्क करणारा प्रवास

आज ती देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल तिनं एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

आज ती देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल तिनं एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

  • Share this:
    मुंबई 18 जून: काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सुंदर चेहरा आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काजलनं बॉलिवूडमध्येही आपलं नशीब आजमावून पाहिलं. अर्थात म्हणावं तसं यश तिला इथे मिळालं नाही. परंतु तिचे चित्रपट तिकिटबारीवर मात्र सुपरहिट ठरले. आज काजलचा वाढदिवस आहे. (Kajal aggarwal birthday) 36 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काजल जवळपास गेली दोन दशकं सिनेसृष्टीत कार्यरत आहे. आज ती देशातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल तिनं एक बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कोण होतीस तू काय झालीस तू! चाळीत राहणारी ही तरुणी ‘Bigg Boss’मुळं झाली सेलिब्रिटी काजलचा जन्म 1985 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला बॉलिवूडचं आकर्षण होतं. त्यामुळं कॉलेजमध्ये असताना तिचं लक्ष मॉडलिंगच्या दिशेने वळलं. मॉडलिंगच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री मिळवता येईल असे प्रयत्न ती करणार होती. दरम्यान तिनं अभिनय आणि डान्स यांचं तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली. हे शिक्षण सुरु असतानाचा तिला एका तमिळ चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अन् तिन् देखील मोठ्या उत्साहानं ती संधी स्विकारली. ‘तू सीतेची भूमिका कर मग आम्ही बघतो’, करीना कपूरला धमकी पुढे तमिळ, तेलुगू, मल्याळम अशा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिला बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून काम मिळू लागले. अन् तिनं देखील अनुभव मिळावा यासाठी ते काम स्विकारलं. मानधनाची पर्वा न करता वेळप्रसंगी ती मोफत देखील एखादा सीन करत होती. तिला केवळ मोठ्या पडद्यावर झळकायचं होतं. तिच्या याच प्रवृत्तीमुळं 2004 साली तिला ‘क्यूँ! हो गया ना’ या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिनं ऐश्वर्या रायच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘लक्ष्मी कल्याणम्’ या चित्रपटात तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला त्यानंतर पुढे ‘चन्दामामा’, ‘पौरुडु’, ‘बोम्मलत्तम’, ‘गणेश जस्ट गणेश’ अशा अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली. दरम्यान ‘मगधीरा’ आणि ‘आर्या 2’ या चित्रपटांनी तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली. अन् आज काजल अग्रवाल भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.
    Published by:Mandar Gurav
    First published: