मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

विकी कौशलला होता वडिलांचा विरोध; पाहा एक इंजिनियर कसा झाला अभिनेता?

विकी कौशलला होता वडिलांचा विरोध; पाहा एक इंजिनियर कसा झाला अभिनेता?

वडिलांचा विरोध पत्करुन विकी कौशलनं धरली बॉलिवूडची वाट; वाचा इंजिनियर कसा झाला लोकप्रिय अभिनेता

वडिलांचा विरोध पत्करुन विकी कौशलनं धरली बॉलिवूडची वाट; वाचा इंजिनियर कसा झाला लोकप्रिय अभिनेता

वडिलांचा विरोध पत्करुन विकी कौशलनं धरली बॉलिवूडची वाट; वाचा इंजिनियर कसा झाला लोकप्रिय अभिनेता

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 16 मे: विकी कौशल (Vicky Kaushal) हा बॉलिवूडमधील सध्याच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारा विकी ‘उरी द सर्जकिल स्ट्राईल’ (Uri: The Surgical Strike) या चित्रपटामुळं रातोरात लोकप्रिय झाला. आज विकीचा वाढदिवस आहे. 33 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विकीला प्रचंड संघर्ष करावा लागला. (success story of Vicky Kaushal) वडिलांचा प्रखर विरोध पत्करुन तो बॉलिवूडमध्ये आला. अन् आज तो एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. पाहूया कधीकाळी इंजियरिंगचा अभ्यास करणाऱ्या विकीचा हा अजब-गजब प्रवास...

विकीचा जन्म 1988 साली मुंबईतील एक उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमध्ये स्टंटमॅन आणि दिग्दर्शकाचं काम करत होते. त्यांनी सिनेसृष्टीत आपला जम बसवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे. अन् हा संघर्ष आपल्या मुलांच्याही वाट्याला येऊ शकतो. शिवाय यश मिळेल का याचीही खात्री नाही. त्यामुळं ते वारंवार विकीच्या अभिनय करण्याच्या आवडीला विरोध करत होते. कुटुंबीयांच्या सांगण्यावरुन विकीनं इंजिनियरिंग केलं. मात्र या क्षेत्रात त्याचं मन रमत नव्हतं.

ती सध्या काय करते? एका अपघाताने बदललं 'आशिकी गर्ल' अनु अग्रवालचं आयुष्य...

परिणामी तो प्रायोगित रंगभूमीवर अभिनय करुन आपली आवड पूर्ण करत होता. कॉलेजमध्ये असल्यापासून तो विविध इंग्रजी आणि हिंदी नाटकांमध्ये काम करत होता. त्यामुळं एकेदिवशी त्यानं इंजियरिंग सोडलं अन् कोणालाच न सांगता अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यास सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीस त्याला दिग्दर्शक व्हायचं होतं. त्यामुळं अनुराग कश्यपकडे तो इंटर्नशिप करत होता. गँग्स ऑफ वासेपूरची निर्मिती होत असताना तो या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. पण त्याच्याकडे अभिनयाचे गुण आहे त्यानं अभिनयच करावा असा सल्ला त्याला वारंवार त्याचे मित्रमंडळी आणि अनुराग कश्यपनं दिला. अखेर सर्वांच्या सांगण्यावरुन त्यानं विविध ठिकाणी ऑडिशन देण्यास सुरुवात केली.

दरम्यान ‘मसान’ या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला तिकिटबारीवर फारसं यश मिळालं नाही. पण समिक्षकांनी मात्र विकीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक केलं. त्यानंतर ‘रामन राघव’, ‘संजू’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तो झळकला. ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटामुळं तो खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Vicky kaushal