Home /News /entertainment /

रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने केलं हे विधान, प्रतिक्रियांचा सूर मात्र बदलला

रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने केलं हे विधान, प्रतिक्रियांचा सूर मात्र बदलला

रियाच्या अटकेनंतर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत

    मुंबई, 8 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला अटक करण्यात आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी एनसीबीने (NCB) रियाची चौकशी केली. यानंतर रियाला अटक करण्यात आली. रियाला अटक केल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) एक प्रतिक्रिया समोर आली आहे. अंकिताने ट्विट करुन लिहिले आहे की, भाग्य आणि योगायोगाने काहीही होत नाही..तुम्ही आपल्या कर्माने आपलं भाग्य बनवता. श्वेता सिंह कीर्तिच्या प्रतिक्रियेवर अंकिता लोखंडेने केली कमेंट याशिवाय सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ति यांच्या पोस्टवर अंकिता लोखंडेने कमेंट केली आहे. तिने अनेक ह्रदयाचे इमोजी शेअर करीत लिहिले - Diiiiiiiiiiiii...रियाच्या अटकेनंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तिने एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करीत आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यांनी हात जोडणारी इमोजी शेअर करीत लिहिले आहे की - देव आपल्यासोबत आहे. हे ही वाचा-BREAKING! अखेर रिया चक्रवर्तीला NCB ने केली अटक; इतर कलाकारही येणार जाळ्यात? सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयासह एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेकडून सीबीआयची मागणी केली जात होती. टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेतील त्या दोघांनी केमिस्ट्री सर्वांनाच भावली होती. ते दोघं बराच काळ एकत्र होते..मात्र काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताला मोठा झटका बसला होता..मात्र रियाने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. हे ही वाचा-अखेर रियाने ड्रग्सबाबत दिली कबुली; बॉलिवूड पार्टींबाबतही केला मोठा खुलासा अंकिताने गेल्या 4 वर्षांत सुशांतशी संवाद साधला नसल्याचा दावा रियाने केला होता..सीबीआयनंतर या प्रकरणात नार्कोटिक्स विभागाने तपास सुरू केला होता, त्यात त्यांना बॉलिवूडमधील ड्रग्ज पार्टींबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्याचे सांगितले जात आहे. आज रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. त्यानंतर तिला शीव रुग्णालयात नेऊन तिच्यावर कोरोना चाचणी करण्यात आली. रियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून यानंतर तिची पुढील तपासणी केली जाईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood, Sushant sing rajput

    पुढील बातम्या