News18 Lokmat

विरुष्काचं आज मुंबईत रिसेप्शन; टीम इंडिया लावणार हजेरी!

ल्लीच्या जंगी रिसेप्शननंतर ते त्यांचं आज दुसरं रिसेप्शन देणार आहे. मुंबईच्या 'द सेंट रेजिस' हॉटेलमध्ये त्या दोघांची रिसेप्शन पार्टी पार पडणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2017 11:05 AM IST

विरुष्काचं आज मुंबईत रिसेप्शन; टीम इंडिया लावणार हजेरी!

26 डिसेंबर : सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असणारी सेलिब्रीटी जोडी म्हणजे विराट आणि अनुष्का. दिल्लीच्या जंगी रिसेप्शननंतर ते त्यांचं आज दुसरं रिसेप्शन देणार आहे. मुंबईच्या 'द सेंट रेजिस' हॉटेलमध्ये त्या दोघांची रिसेप्शन पार्टी पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण टीम रिसेप्शन पार्टीमध्ये उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जातंय.

इटलीमध्ये या दोघांचं लग्न झालं. नंतर ते हनिमूनसाठी ते फिनलँडला गेले होते. काही दिवसांपूर्वीच ते भारतात परतले आहेत. दिल्लीतच्या रिसेप्शन नंतर ते दोघंही मुंबईत आहेत. आजच्या या पार्टीमध्ये बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे.

भारतीय संघाने 24 डिसेंबरला श्रीलंकेविरुद्धचा आपला शेवटचा टी -20 सामना मुंबईमध्ये जिंकला ही पार्टी संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...