मनोरंजन विश्वातील हादरवणारं वास्तव; प्रसिद्ध अभिनेत्याकडे उपचारासाठी नाहीत पैसे, मागतोय मदत

मनोरंजन विश्वातील हादरवणारं वास्तव; प्रसिद्ध अभिनेत्याकडे उपचारासाठी नाहीत पैसे, मागतोय मदत

एकेकाळी लोकांचं मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्यावर अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवली आहे

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूनंतर टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील खरं रुप समोर आलं आहे. त्यातच ब़ॉलिवूडमधील आणखी एक बातमी समोर आली आहे. टीव्ही शो 'मन की आवाज प्रतिज्ञा' (TV Show Mann Kee Awaaz Pratigya) यामधील आपल्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेता अनुपम श्याम (TV Actors Anupam Shyam) यांना सोमवारी रात्री मुंबईतील एका रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आलं.

त्यांच्या उपचारासाठी अनुपम यांच्या भावाने इंडस्ट्रीतील लोकांकडे मदत मागितली आहे. डायलिसिस झाल्यानंतर सोमवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली. अनुपम श्याम हे गोरेगावमधील लाइफलाइन रुग्णालयात दाखल आहेत.

हे वाचा-Lockdown मध्ये स्टार अभिनेता खेळत होता जुगार, पोलिसांनी टाकली धाड आणि...

अनुपम यांच्या आरोग्य आणि आर्थिक अडचणीबाबत त्यांच्या भावाने सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून त्यांची तब्येत खराब झाली आहे. त्यांच्या मूत्रपिंडात संसर्ग झाला असून ज्यामुळे त्यांना हिंदूजा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तेथे दीड महिन्यापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वारंवार डायलिसिस करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डायलिसिसमध्ये खूप खर्च झाल्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र आयुर्वेदिक उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर डायलिसिस न केल्यामुळे त्यांच्या छातीत पाणी जमा झाले. आता डायलिसिस पुन्हा सुरू केले तेव्हा त्यांना बरं वाटतं आहे.

अनुराग यांनी सांगितले की मालाडच्या एका रुग्णालयात त्यांना डायलिसिससाठी आणलं होतं. येथील ड़ॉक्टरांनी त्यांना आयसीयू असलेल्या रुग्णालयात हलविण्यात सांगितले. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जात असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले. श्याम यांचे पैसे त्यांच्या उपचारावर खर्च झाल्याचे अनुराग यांनी सांगितले.

Published by: Meenal Gangurde
First published: July 28, 2020, 4:27 PM IST

ताज्या बातम्या