अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटाबद्दल मालसुरेंच्या वंशजांचा मोठा खुलासा

अजय देवगणच्या 'तानाजी' चित्रपटाबद्दल मालसुरेंच्या वंशजांचा मोठा खुलासा

बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण याचा आगामी तानाजी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.

  • Share this:

पोलादपूर, 15 नोव्हेंबर : बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण याचा आगामी तानाजी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 'तानाजी' या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित हिंदी चित्रपटाचे नाव योग्य असल्याचा निर्वाळा मालुसरेंच्या वंशजांनी दिला आहे.

शिवाजी महाराजांनी तानाजींच्या कलेवरावर ठेवलेली समुद्रकवडयांची ऐतिहासिक राजमाळ न्यूज18 लोकमत मार्फत जगासमोर आणून ऐतिहासिक दाखलेही सादर केले. समुद्रकवड्यांची राजमाळ अद्याप आपणाकडे एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवली असल्याचं मालुसरेंच्या वंशज डॉ. शीतल मालुसरेंनी सांगितलं.

तान्हाजींना शिवराय देणार होते विशेष बक्षीस

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतिकुल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य निर्माण केले. मोगलांना तहात दिलेले 23 पैकी 22 किल्ले शिवरायांनी जिंकून अवघ्या सहा महिन्यात स्वराज्यात घेतले. मात्र,कोंढाणा किल्ला मोगलांकडे होता. तो जिंकणे कठीण होते. कोंढाण्याच्या इतिहासात लढाईत कोंढाणा कोणालाही जिंकता आला नव्हता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना कोंढाणा मोहिमेवर पाठविण्याचे ठरविले होते. पण, पुत्र रायबाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यास गेलेल्या तान्हाजी मालुसरे यांना शिवछत्रपतींनी एक विशेष बक्षीस देण्याचे ठरवले होते.

मात्र, पुत्राच्या रायबाच्या लग्नाच्या निमंत्रण देऊन 'आधी लगीन कोंढाण्याचं....मग माझ्या रायबाचे' अशी गर्जना करीत तान्हाजींनी कोंढाणा जिंकला पण कोंढाण्याची मोहिम फत्ते करताना तानाजी धारातिर्थी पडल्याने शिवछत्रपतींनी तानाजींना बक्षीस देण्याचे ठरविलेली समुद्रकवड्यांची राजमाळ तान्हाजींच्या कलेवरावर ठेवून 'गड आला पण माझा सिंह गेला... तान्हा गेला' अशी भावूक साद दिली होती.

सदरची समुद्रकवड्यांची राजमाळ अद्याप आपणाकडे एक ऐतिहासिक ठेवा म्हणून जपून ठेवली असल्याचं सांगून डॉ. शीतल मालुसरे यांनी या राजमाळेचे दर्शन घडवलं.

=============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या