अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली! 'मिर्जापूर-2' रिलीजची तारीख आली समोर, पाहा Teaser

अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली! 'मिर्जापूर-2' रिलीजची तारीख आली समोर, पाहा Teaser

'जगात दोन प्रकारचे लोक असतात. जिवंत आणि मृत...आणि तिसरे असतात जखमी..आमचं सर्वस्व घेतलं आणि आम्हाला जिवंत सोडलं..चूक केली'

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : वेब सीरिज 'मिर्जापुर' (Mirzapur) च्या फॅन्ससाठी गुड न्यूज आहे. फॅन्स गेल्या अनेक दिवसांपासून दुसऱ्या सीजनची प्रतीक्षा करीत होते. आता तब्बल 2 वर्षांनंतर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) मध्ये 'मिर्जापुर 2' (Mirzapur 2) प्रदर्शित होण्याची घोषणा केली आहे. अॅमेजॉन प्राइम व्हिडीओने एक टीजर जारी केला आहे. यामध्ये दिल्यानुसार 'मिर्जापुर 2' 23 ऑक्टोबरपासून स्ट्रीम होणार आहे. याचं प्रसारण जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये अॅमेजॉन प्राइम व्हिडीओवर होईल.

टिजरच्या बॅगराऊंडमध्ये दिल्यानुसार जगात दोन प्रकारचे लोक असतात. जिवंत आणि मृत...आणि तिसरे असतात जखमी..आमचं सर्वस्व घेतलं आणि आम्हाला जिवंत सोडलं..चूक केली..

मिर्झापूरच्या पहिल्या सीजनमध्ये दोन भाऊ आणि एक गँगस्टरची गोष्ट होती. ही वेब सीरिज 2018 मध्ये रिलीज झाली होती आणि लोकांनी खूप पसंत केली होती. यामध्ये लीडिंग गँग्समध्ये मारहाण, शत्रूत्व आदी गोष्टी दाखविण्यात आल्या होत्या. प्रेक्षकांनी ही वेब सीरिज उचलून धरली होती. पहिल्या सीजनमध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मॅसी, अली फजल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, राजेश तेलंग, अमित सियाल आणि अंजुन शर्मा मुख्य भूमिकेत होते.

मिर्जापूरच्या दुसऱ्या सीजनमध्ये इशा तलवार, प्रियांशू पंदौली आणि विजय वर्मा यांची एन्ट्री होईल. या वेब सीरिजचे दिग्दर्शक गुरमीत सिंह आणि मिहीर देसाई आहेत. ही वेब सीरिज फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्या एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट यांनी प्रोड्यूस केलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 24, 2020, 6:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या