'लक्ष्मी' चित्रपटाचा खरा हीरो अक्षय नाही तर मराठमोळा शरद केळकर; प्रेक्षकांनी दिली अशी रिअॅक्शन

'लक्ष्मी' चित्रपटाचा खरा हीरो अक्षय नाही तर मराठमोळा शरद केळकर; प्रेक्षकांनी दिली अशी रिअॅक्शन

अक्षय कुमार स्टारर चित्रपट 'लक्ष्मी' सोमवारी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला. तमिळ हॉरर कॉमेडी फिल्म कंचनाच्या या ऑफिशियल हिंदी रिमेक चित्रपटात अक्षय कुमारने एका मुस्लीम तरुणीची भूमिका निभावली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 नोव्हेंबर : अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर चित्रपट 'लक्ष्मी' (Lakshmi) सोमवारी डिज्नी प्लस हॉटस्टारवर (Hotstar) रिलीज झाला. तमिळ हॉरर कॉमेडी फिल्म कंचनाच्या या ऑफिशियल हिंदी रिमेक चित्रपटात अक्षय कुमारने एका मुस्लीम तरुणीची भूमिका निभावली आहे. ज्याच्या शरीरात एका किन्नराचं भूत शिरतं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शरद केळकर दिसून येत नाही, मात्र चित्रपटात अचानक येऊन तो सर्वांना सरप्राइज करतो.

'तानाजी' चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका निभावलेल्या शरद केळकरची (Sharad Kelkar) एन्ट्री चित्रपटात तेव्हा येते जेव्हा लक्ष्मीची आत्मा तिच्या मृत्यूची कहाणी ऐकवते. चित्रपटात शरदच्या एन्ट्रीपासून त्याच्या अभिनयापर्यंत सर्वच अत्यंत दमदार आहे. सोशल मीडियावर अक्षयहून जास्त कौतुक शरद केळकरचं केलं जात आहे. युजर्सकडून त्याच्या कामाच्या विविधतेचं खूप कौतुक केलं जात आहे.

चित्रपटात शरद केळकर यांनी जरी 13 ते 15 मिनिटांचा रोल असला तरी त्यांनी तो खूप चांगला निभावला आहे. एका युजरने ट्विट करीत शरदचा शिवाजी महाराजांचा लुक आणि लक्ष्मीच्या लूकचे कोलाज शेअर केले आहे. यावर त्याने लिहिल की, जर अक्षय कुमार चित्रपटाचं ह्रदय होते तर शरद केळकर या चित्रपटाचा आत्मा होते.

एका दुसऱ्या युजरने लिहिलं की, शरद केळकरने लक्ष्मीला खूप वास्तविक केलं आहे. या चित्रपटातून मला एक गोष्ट कळाली की, अंडर रेटेड शरद केळकर यांच्यासाठी माझा रिस्पेक्ट खूप वाढला आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, मी अक्षय कुमारचा खूप मोठा फॅन आहे. मात्र या चित्रपटातील खरा हिरो शरद केळकर आहे. कमाल सादरीकरण आणि अभिनय...

तर एका युजरने लिहिलं की, शरद जेव्हा आपल्या चित्रपटात रडत होते तेव्हा मलाही अश्रू आवरता आले नाहीत. तुम्हाला भविष्यासाठी खूप शुभेच्छा...या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची प्रतिक्रिया खूप चांगली असल्याचे दिसत नाही. त्यांचं म्हणणं आहे ज्या विषयावर चित्रपट तयार करण्यात आला आहे, तो मुद्दा चित्रपटात खूप कमी वेळासाठी आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 10, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या