मुंबई, 8 डिसेंबर: कॉमेडी किंग (Comedy King ) म्हणून प्रसिद्ध असलेला कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या कॉमेडी करण्याच्या कौशल्यामुळे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कपिल शर्मा हे नाव माहिती आहे. कपिल शर्मा त्याच्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना (audience) हसवतो. आज सर्वजण त्याला ओळखतात, पण हा प्रवास ( journey ) त्याच्यासाठी खूप खडतर (difficult) होता. कपिल अनेकदा त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलताना दिसतो. 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या लोकप्रिय शोमुळे कपिल हा नेहमीच चर्चेत राहतो. परंतु कपिल शर्मा याचा भाऊ आणि बहीण काय करतात? हे क्वचितच कोणाला माहीत असेल. चला तर मग आज कपिल शर्माच्या फॅमिलीबद्दल जाणून घेऊयात.
कपिल शर्माच्या कुटुंबाचा मनोरंजन जगताशी कोणताही संबंध नाही. कपिल शर्मा इतका प्रसिद्ध असूनही त्याचे कुटुंब प्रसिद्धीपासून नेहमी दूर राहते. कपिलची आई आणि पत्नी यांच्यासोबतच त्याची भावंडं मनोरंजन जगतापासून दूर आहेत. कपिलला एक भाऊ आणि एक बहीण आहे. त्याच्या भावाचे नाव अशोक तर बहिणीचे नाव पूजा आहे.
कपिल त्याच्या भावंडांमध्ये लहान असल्याने तो सर्वांचा लाडका आहे. मात्र, भाऊ एवढा प्रसिद्ध असूनही कपिलची भावंडं मनोरंजन जगतापासून दूर आहेत. कपिलचा भाऊ अशोक शर्मा त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असून अमृतसर ग्रामीण पोलिसात हेड कॉन्स्टेबल आहे. कपिल शर्माची बहीण पूजाबद्दल बोलायचे झाले तर ती देखील प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करते. तिचं लग्न झालं असून तिचं सासरचं आडनाव देवगण आहे. पूजाला एक मुलगा आहे.
कपिल शर्माच्या शोमध्ये नुकताच सनी देओल त्याचा मुलगा करण देओलसोबत त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. या शो मध्ये कपिलने सनी-करण या पिता-पुत्राच्या जोडीसोबत खूप धमाल केली. याशिवाय, त्याने सलमान खानच्या अंतिम चित्रपटाच्या टीमसोबतही खूप मस्ती केली.
कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, कपिल शर्मा 'द कपिल शर्मा शो' या कॉमेडी शोचा होस्ट आहे. ज्यामध्ये तो बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटींना आमंत्रित करतो, आणि त्यांच्यासोबत प्रेक्षकांना खूप हसवतो. याशिवाय 'किस किस को प्यार करूं' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. कॉमेडी करीत प्रेक्षकांना हसवण्याचे काम सोपे नसते. पण कपिल शर्माने स्वतःच्या हिंमतीच्या बळावर ते करून दाखवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.