मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुनील दत्त यांनी नर्गिससाठी घेतला होता डॉनशी पंगा; मिळाली जीवे मारण्याची धमकी

सुनील दत्त यांनी नर्गिससाठी घेतला होता डॉनशी पंगा; मिळाली जीवे मारण्याची धमकी

मुंबईतील डॉन सुनील दत्त यांच्यावर भयंकर चिढला होता; पाहा कसा केला होता त्यांनी त्या गुन्हेगाराचा सामना

मुंबईतील डॉन सुनील दत्त यांच्यावर भयंकर चिढला होता; पाहा कसा केला होता त्यांनी त्या गुन्हेगाराचा सामना

मुंबईतील डॉन सुनील दत्त यांच्यावर भयंकर चिढला होता; पाहा कसा केला होता त्यांनी त्या गुन्हेगाराचा सामना

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 6 जून: सुनील दत्त (Sunil Dutt) हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जायचे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी जवळपास तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘मदर इंडिया’, ‘वक्त’, ‘पडोसन’, ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ त्यांचे असे कित्येक चित्रपट आहेत जे आजही चाहते मोठ्या आवडीन पाहतात. सुनील दत्त यांनी रुपेरी पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल त्यांचं खासगी आयुष्य देखील थरारक घटनांनी भरलेलं होतं. एकदा तर मुंबईतील एका डॉननं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आज सुनील दत्त यांचा स्मृतीदिन आहे. (Sunil Dutt birth anniversary) त्यानिमित्तानं पाहुया काय होता तो थक्क करणारा प्रसंग...

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली, हिंदुजा रुग्णालयात दाखल

सुनील दत्त यांचा ‘मदर इंडिया’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. खरं तर हा चित्रपट अभिनेत्री नर्गिस यांच्यामुळं गाजला होता. परंतु सोबतच आणखी एक घटना घडली की ज्यामुळं चित्रपटाची चर्चा सर्वदूर पसरली. ती घटना म्हणजे सुनील दत्त आणि नर्गिस यांचं प्रेम प्रकरण. चित्रपटाच्या निमित्तानं दोघांमध्ये मैत्री झाली, दोघं प्रेमात पडले अन् पुढे लग्नाचा निर्णय घेतला. परंतु लग्न करणं हे दिसतं तितकं सोपं नव्हतं. त्यांच्या लग्नाच्या चर्चा ऐकून मुंबईमधील एक डॉन नाराज झाला होता. त्याने सुनील दत्त यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. परंतु सुनील दत्त बिलकूल घाबरले नाहीत. त्यांनी या विषयावर डॉनशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला.

22 व्या वर्षीच बोहल्यावर चढले होते राज कपूर; नाटक करायला गेले अन् लग्न करुन मुंबईत परतले

डॉनला भेटल्यानंतर सुनील दत्त म्हणाले, ‘माझे नर्गिसवर प्रचंड प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मी तिला आयुष्यभर आनंदात ठेवेन. माझे बोलणे जर तुम्हाला चुकीचे वाटत असेल तर मला गोळी घाला आणि खरे वाटत असेल तर मला मिठी मारा.’ त्यांचे हे बोलणे ऐकून डॉन त्यांच्यावर खुश झाला. त्यानंतर 1958 साली नर्गिस आणि सुनील दत्त यांचा विवाह झाला. हा किस्सा संजू या चित्रपटात देखील दाखवण्यात आला आहे. अशा प्रकारे सुनील दत्त यांनी त्यावेळच्या मुंबईतील एक खतरनाक डॉनशी दोन हात केले होते.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment