बिनधास्त 'पंगा गर्ल' च्या सुरक्षेसाठी आईने केला महामृत्यूंजय मंत्राचा जप

बिनधास्त 'पंगा गर्ल' च्या सुरक्षेसाठी आईने केला महामृत्यूंजय मंत्राचा जप

बॉलिवुडची 'पंगा गर्ल' कंगना रनौत केवळ फिल्म इंडस्ट्रीचं नाही तर कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करायला घाबरत नाही.

  • Share this:

मनाली, 16 ऑगस्ट : बॉलिवुडची 'पंगा गर्ल' कंगना रनौत केवळ फिल्म इंडस्ट्रीचं नाही तर कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करायला घाबरत नाही. तिने बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रोडक्शन हाऊस सह करन जोहर (Karan Johar), महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांच्यावर सार्वजनिकपणे टीका केली आहे. तर बॉलिवूडच्या सोशल मीडियावर सक्रिय अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं.

View this post on Instagram

माताजी मेरी सुरक्षा के विषय में चिंचित रहती हैं, इसी के चलते उन्होंने एक लाख पेंद्रह हज़ार महामृतुंजय मंत्र के जाप करवाए, यह कार्यक्रम आज समाप्त हुआ, मैं अपने समस्त परिवार की धन्यवादी हूँ । हर हर महादेव काशीविश्वनाथ महाराज की जय🙏 - कंगना

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

तिने सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमच्या मुद्द्यांवर मोठी चर्चा सुरू केली आहे. यावेळी त्यांनी बॉलिवूडच्या स्टार किड्सवर टीका केली. यामुळे कंपनाच्या आईने तिच्या सुरक्षेसाठी चिंता व्यक्त केली आहे. कंगना सुरक्षित राहावी यासाठी तिच्या आईने महामृत्यूंजय मंत्राचा जप करवून आणला. कंगना रनौत (Kangana Ranaut) च्या टीमने एक इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

सुशांत सिंह प्रकरणात कंगना सीबीआयची मागणी करीत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर तिने नेपाटिजमवर निशाणा साधला आहे. यावेळी कंगनाने सुशांतच्या मृत्यूमागे नेपोटिजम हेदेखील हे कारण असल्याचे सांगितले होते.

Published by: Meenal Gangurde
First published: August 16, 2020, 8:37 PM IST

ताज्या बातम्या