मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss 16 ची सर्वात महागडी स्पर्धक आहे 'ही' अभिनेत्री, फी ऐकून व्हाल थक्क

Bigg Boss 16 ची सर्वात महागडी स्पर्धक आहे 'ही' अभिनेत्री, फी ऐकून व्हाल थक्क

बिग बॉस 16

बिग बॉस 16

लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा नवीन सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून यंदाच्या पर्वाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 3 ऑक्टोबर : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा नवीन सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून यंदाच्या पर्वाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकापेक्षा एक धमाकेदार स्पर्धकांनी यंदाच्या सीझनमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे 'बिग बॉस 16'मध्ये जोरदार राडा होणार हे तर नक्की आहे. अशातच या सीझनसाठी स्पर्धकांनी चिक्कार फी घेतली आहे. यातील सर्वात जास्त फी घेतलेल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे.

टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीर खान या हंगामील सर्वात तरुण सदस्य आहे. 'इमली' या मालिकेतून घराघरांत पोहचलेल्या सुंबुलने या सीझनमधील सर्वात जास्त फी घेतली असल्याचं समोर आलं आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सुंबुल प्रत्येक आठवड्यासाठी 12 लाख रुपये आकारत आहे. ती सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे.

हेही वाचा -  VIDEO: बिग बॉस 16 मध्ये मोडली 15 वर्षे जुनी परंपरा, घोषणा ऐकून सगळेच दुःखी

गेल्या वर्षीच्या सीझनची वीनर तेजस्वी प्रकाशलाही तिनं मागे सोडलं आहे. तेजस्वीला बिग बॉस 15 मध्ये प्रत्येक आठवड्यासाठी 10 लाख रुपये मिळत होते. त्यामुळे सध्या सगळीकडे इमलीची म्हणजेच सुंबुल तौकीरचीच चर्चा सुरु आहे. वयाच्या 19 व्या वर्षी सुंबुलने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील कटनी येथे एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेली सुंबूल फक्त 19 वर्षांची आहे, ती बिग बॉस 16 मधील सर्वात तरुण स्पर्धक आहे. ती प्रसिद्ध टेलिव्हिजन कोरिओग्राफर हसन खान यांची मुलगी आहे. सुंबूल आणि त्याची बहीण सानिया तौकीर, जी एक अभिनेत्री आहे, या दोघींचे पालनपोषण त्यांच्या वडिलांनीच केले आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment, Salman khan, Tv actress