Home /News /entertainment /

नेहा कक्करच्या प्रपोजलला रोहनप्रीत सिंग का म्हणाला Yes ?

नेहा कक्करच्या प्रपोजलला रोहनप्रीत सिंग का म्हणाला Yes ?

नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि फेमस पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) नुकतेच लग्नबंधनात अडकले. नेहा रोहनप्रीतपेक्षा तब्ब्ल 7 वर्षांनी मोठी असून देखील नेमकं नेहा आणि रोहनप्रीतमध्ये असं काय घडलं की रोहनप्रीत लगेच बोहल्यावर चढायला तयार झाला?

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 डिसेंबर : बॉलीवूड कपल्स (Bollywood Couple) आणि त्यांची लग्नाची गोष्ट हा कायमच त्यांच्या फॅन्ससाठी आवडीचा विषय असतो. प्रसिद्ध गायिका आणि रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली सेलेब्रिटी नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि फेमस पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) नुकतेच लग्नबंधनात अडकले. नेहा कक्करचं (Neha Kakkar) लग्न होण्याआधी काही महिने तिच्या आणि आदित्य नारायणच्या (Aditya Narayan) रेलशनशिप बाबत चर्चा रंगात होत्या. पण नेहाने लगेच नवा टर्न घेऊन रोहनप्रीतला (Rohanpreet) गाठलं आणि इतकंच नाही तर त्याच्याबरोबर लग्नही केलं. नेहाच्या सगळ्याच फॅन्सला या  लग्नामागची गोष्ट नेमकी आहे तरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. लग्ननंतर पहिल्यांदाच नेहा तिच्या नवरा रोहनप्रीत बरोबर द कपिल कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) मध्ये येऊन गेली. शो दरम्यान दोघांनीही एकमेकांचे सेक्रेटस आणि आवडीनिवडी प्रेक्षकांपुढे सांगितल्या. कपिल शर्माने (Kapil Sharma) नेहाला तिची लव्ह स्टोरी (Love Story)  विचारली असता नेहाने तिच्या आणि रोहनप्रीतच्या 'मीटिंग टू वेडींग' (Meeting to Wedding) चा किस्सा प्रेक्षकांसमोर मांडला. नेहा आणि रोहनप्रीतची पहिली भेट चंदीगड (Chandigarh) मध्ये 'नेहू दा व्याह' (Nehu Da Vyah) गाण्याच्या शूटिंग दरम्यान झाली. काही वेळ सोबत घालवल्यानंतर नेहाने रोहनप्रीतला सांगितलं मी  तुझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये (Relationship) राहू शकणार नाही पण मला तुझ्याबरोबर लग्न करायला आवडेल. रोहनप्रीत सध्या फक्त २५ वर्षांचा असल्याने त्याने तेव्हा नेहाला नकार दर्शवला. पण नंतर दुसऱ्या दिवशी रोहनप्रीतने लगेच 'मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, चल लग्न करू या', म्हणत नेहाला होकार दिला. नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नापासून ते हनिमूनपर्यंत सगळेच फोटोस सोशल मीडिया वर जोरदार वायरल झालेले आहेत. हे कपल सध्या बॉलीवूडच्या मोस्ट ट्रेंडिंग कपल पैकी एक असून सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kapil sharma, Neha kakkar, The kapil sharma show

    पुढील बातम्या