The Lion King मधून शाहरुखच्या मुलाचा डेब्यू, प्रेक्षकांना पडली आर्यनच्या आवाजाची भुरळ

The Lion King मधून शाहरुखच्या मुलाचा डेब्यू, प्रेक्षकांना पडली आर्यनच्या आवाजाची भुरळ

The Lion King च्या हिंदी टीझरमधील हा आवाज नक्की शाहरुखचा की, आर्यनचा हे ओळखणं कठीण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : अभिनेता शाहरुख खानसाठी आजचा दिवस खूप अभिमानाचा आहे. कारण आज त्याचा मुलगा आर्यन खान ऑफिशिअली एक कलाकार म्हणून सर्वांच्या समोर आला आहे. The Lion King या सिनेमाचा हिंदी टिझर आज रिलीज झाला आणि यातील आर्यनचा आवाज ऐकून सर्वच थक्क झाले. आर्यननं या सिनेमातील मुसाफा या सिंहाचा मुलगा सिंबाच्या भूमिकेला आवाज दिला आहे. मात्र हा टीझर रिलीज झाल्यावर आर्यनचा आवाज ऐकल्यावर अनेकांचा गोंधळ उडाला. हा आवाज नक्की शाहरुखचा की, आर्यनचा हे ओळखणं कठीण झालं आहे. या सिनमातून आर्यननं सिने सृष्टीत पदार्पण केलं आहे.

The Lion King च्या टीझरमध्ये सिंबा म्हणतो, ‘मी आहे सिंबा, मुसाफाचा मुलगा. बाबांनी मला सूर्यप्रकाश ज्या वस्तूपर्यंत पोहोचतो त्या प्रत्येकाचं रक्षक बनवलं होतं. आता मी नाही लढलो तर कोण लढणार.’ या व्हिडिओमध्ये आर्यनचा आवाज हुबेहूब शाहरुख प्रमाणे वाटत आहे. शाहरुखच्या आवाजातली जादू आर्यनच्या आवाजात कणभर जास्तच जाणवते. त्यामुळे आर्यनच्या आवाजाची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. पडद्यामागे जर आर्यनच्या आवाजाची जादू एवढी असेल तर मग बॉलिवूडमध्ये तो काय कमाल करेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही. या सिनेमासाठी मुसाफाच्या भूमिकेसाठी शाहरुखनं आवाज दिला असून हा सिनेमा येत्या 19 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉयकॉट केलेलं असतानाही कंगना घेतेय सर्वाधिक मानधन, या आहेत टॉप 10 अभिनेत्री

 

View this post on Instagram

 

Delighted to be a part of this global legacy. In Cinemas 19th July. Yaad Rakhna. #TheLionKing @disneyfilmsindia

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

आर्यनच्या डेब्यू बद्दल बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू होती. ‘स्टूडंट ऑफ द इयर 2’मधून आर्यन डेब्यू करणार असल्याचं बोललं जात होत मात्र नंतर या सिनेमासाठी टायगर श्रॉफला साइन करण्यात आलं. पण आता अखेर The Lion King मधून आर्यन डेब्यू केला. या सिनेमची कथा सुरुवातीपासून सर्वांना खूप जवळची वाटत आहे. त्यामुळे आता शाहरूख- आर्यन आणि मुसाफा-सिंबा या बाप-लेकाच्या कनेक्शनबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताला ट्रेकदरम्यान आला पॅनिक अटॅक, शेअर केला जीवघेणा

बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म

=============================================================

VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली

First published: July 11, 2019, 1:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading