Home /News /entertainment /

अशी सुरू झाली होती पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रींची रोमँटिक Love Story, आज हे कपल मोठ्या पडद्यावर करतंय कमाल!

अशी सुरू झाली होती पल्लवी जोशी-विवेक अग्निहोत्रींची रोमँटिक Love Story, आज हे कपल मोठ्या पडद्यावर करतंय कमाल!

The Kashmir Files च्या निमित्ताने विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची प्रेमकहाणी (Vivek Agnihotri and Pallavi Joshi Love Story) चर्चेत आली आहे. एका कॉन्सर्टमध्ये हे दोघं पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते

मुंबई, 16 जानेवारी: काश्मिरी पंडितांच्या वेदना मोठ्या पडद्यावर मांडणारा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विवेक यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी (Pallavi Joshi latest movie) या चित्रपटात विशेष भूमिका साकारली असून, त्या चित्रपटाच्या निर्मात्यादेखील (The Kashmir Files Producer) आहेत. या चित्रपटाच्या प्रत्येक प्रमोशनल इव्हेंटमध्ये विवेक अग्निहोत्रींसोबत पल्लवीही हजेरी लावताना दिसत आहे. या दरम्यान विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची प्रेमकहाणी (Vivek Agnihotri and Pallavi Joshi Love Story) अनोखी आहे. एका कॉन्सर्टमध्ये हे दोघं पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते; पण प्रेम ते लग्न हा त्यांचा प्रवास दीर्घ होता. एकमेकांना जवळपास तीन वर्षं डेट केल्यानंतर हे दोघं विवाहबद्ध झाले. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी हे दांपत्य सध्या विशेष चर्चेत आहे. विवेक आणि पल्लवीनं अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं आहे. 'एकत्र काम केल्यानं आमच्यातले बंध अधिक घट्ट झाले,' असं विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं. 'एकत्र काम केल्यानं आमच्या वैवाहिक जीवनावर सतरात्मक परिणाम झाला आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या व्यावसायिक क्षमतांचा सन्मान करतो,' असं विवेक म्हणतात. आज तकने याविषयी वृत्त दिलं आहे. हे वाचा-The Kashmir Files नंतर चर्चेत आलेल्या फुटीरतावादी नेत्यांच्या मुलांची लॅविश लाईफ खरं तर विवेक अग्निहोत्रींचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचं आणि अभिनेत्री पल्लवी जोशीचं प्रेम कसं फुललं याविषयी फारशी माहिती नाही. 'शादी टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी पल्लवी जोशीसोबतचा पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, '1990 मध्ये आम्ही दोघं एका रॉक कॉन्सर्टमध्ये (Rock Concert) भेटलो होतो. त्या वेळी तिची आणि माझी वैयक्तिक ओळख नव्हती; पण आमच्यात काही तरी साम्य आहे, असं मला वाटत होतं. त्या कॉन्सर्टमध्ये आम्ही दोघंही खूप कंटाळलो होतो, हीच ती गोष्ट असावी, असं मला वाटतं.' त्यावर पल्लवी जोशी यांनी सांगितलं, 'मला खूप तहान लागली होती. त्याच वेळी विवेक मला पिण्यासाठी काहीतरी घेऊन आले. पहिल्या भेटीत विवेक मला फारसे आवडले नव्हते. मला त्यांचा स्वभाव काहीसा उर्मट वाटला होता.' हे वाचा-द कश्मीर फाइल्स बघण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवस सुट्टी, या राज्याचा निर्णय मात्र नंतरच्या काळात विवेक आणि पल्लवी यांचे एकमेकांशी संबंध जुळले. दोघं एकमेकांना व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळीवर चांगले ओळखू लागले. त्यानंतर दोघांनी सुमारे तीन वर्षं डेटिंग केलं. 28 जून 1997 रोजी हे दोघं मुंबईत विवाहबद्ध झाले. या दांपत्याला दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे विवेक आणि पल्लवी पती-पत्नीपेक्षा एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 'वैवाहिक जीवनात मैत्रीच सर्वकाही असते, असा त्यांचा विश्वास आहे. वैवाहिक जीवनात मैत्री नसेल तर ते अधिकच क्लिनिकल होतं,' असं विवेक यांना वाटतं
First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Jammu kashmir

पुढील बातम्या