मुंबई, 25 मार्च: द कश्मीर फाइल्स या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (The Kashmir Files BO Collection) कमालीचे रेकॉर्ड्स केले आहेत. दरम्यान या सिनेमाशी संबंधित लोकांना प्रसिद्धी-यश मिळत आहे, मात्र त्याबरोबर त्यांना वाद-काँट्रोव्हर्सीजना देखील सामोरे जावे लागत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळींबाबत केलेले वक्तव्य सध्या वादाचा मुद्दा ठरत आहे. भोपाळमध्ये राहणाऱ्यांबद्दल विवेक अग्निहोत्रींचे वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी कठोर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत अग्निहोत्रींवर टीका केली आहे.
सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्रींची एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते असं वक्तव्य करताना दिसत आहेत की- मी भोपाळमध्ये लहानाचा मोठा झालो आहे पण मी भोपाळी नाही आहे. कारण भोपाळी एक वेगळा connotation आहे. मी तुम्हाला कधीतरी खाजगीत सांगेन. कोणत्याही भोपाळीला विचारा, भोपाळीचा अर्थ होमोसेक्शुअल आहे, नवाबी शौक असणारा.
हे वाचा-'The Kashmir Files मुळे तरुणांना प्रेरणा', अनुपम खेर यांनी शेअर केला या खास गाण्याचा VIDEO
विवेक अग्निहोत्रींवर भडकले दिग्विजय सिंह
विवेक अग्निहोत्रींच्या या वक्तव्याने काँग्रेस नेते दिग्विजय सिंह संतापल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी ट्वीट करत विवेक अग्निहोत्रींवर टीका केली आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'विवेक अग्निहोत्रीजी हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. हा भोपाळच्या सामान्य रहिवाशाचा अनुभव नाही. मी 77 पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही राहिलात तरी 'संगतीचा प्रभाव असतोच'.
इस दोयम दर्जे की मान्यता के लिए मेरी ओर से..#I_M_Sorry_Bhopal
भोपाली होना होमोसेक्सुअल होना कैसे हो सकता है..? लखनऊ,हैदराबाद,मैसूर भी तो नवाबी शहर हैं..तो क्या वहां भी..! छि: अगर हम भी कहते फिरें कि तनु श्री दत्त आपको लेकर ऐसा बोलती है तो क्या आप मान लेंगे.!@vivekagnihotri pic.twitter.com/teh5fmixZ0 — Govind ਗੋਵਿੰਦ گووند गोविंद गुर्जर (@govindtimes) March 25, 2022
दरम्यान दिग्विजय सिंह यांच्या टीकेवर अद्याप विवेक अग्निहोत्री यांचे कोणतेही उत्तर आलेले नाही. यावर द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
विवेक अग्निहोत्रींच्या या वक्तव्यावर सामान्य ट्विटर युजर्सनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी भोपाळमध्ये हा जोक सामान्य असल्याचे म्हटले आहे तर काहींनी हा भोपाळकरांचा अपमान असल्याची टीकाही केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News