'द कपिल शर्मा शो' परत येतोय, कोण-कोण असणार सस्पेन्स कायम

'द कपिल शर्मा शो' परत येतोय, कोण-कोण असणार सस्पेन्स कायम

'द कपिल शर्मा'च्या पहिल्या सीझनमध्ये काहीच नवे बदल होत नसल्याने कपिलने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता.

  • Share this:

16 डिसेंबर : कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या जोमाने छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झालाय. 'द कपिल शर्मा शो'चं दुसरं सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2018मध्ये कपिलच्या या कॉमेडी शोचं नवं रुप त्याच्या चाहत्यांना पाहता येईल.

कपिल या कॉमेडी शोच्या सध्या जोरदार तयारीला लागलाय. एवढंच नव्हे तर लवकरच कपिल शोच्या दुसऱ्या सीझनचं प्रोमो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शूट देखील करणार आहे. कपिलचा चाहतावर्ग फारच मोठा असल्याने त्याचा हा नवा शो कसा असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागलीये.

'द कपिल शर्मा'च्या पहिल्या सीझनमध्ये काहीच नवे बदल होत नसल्याने कपिलने काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. तसंच कपिल आणि सुनिल ग्रोवर मध्येही यादरम्यान मतभेद निर्माण झाले. मात्र आता या नव्या सीझनमध्ये शोचा कायापालट होताना दिसणार आहे. शोच्या या नव्या सीझनमध्ये नक्की कोण कोणते कलाकार झळकणार हे अजुनही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलंय.

First published: December 16, 2017, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading