मुंबई, 24 जानेवारी: सोनी टीव्हीवर दिसणारा 'द कपिल शर्मा शो' हा हिंदी भाषेतील सर्वात जास्त पाहिला जाणारा कॉमेडी शो आहे. अगदी देश विदेशातून लोकं हा शो पाहण्यासाठी येतात. या कार्यक्रमावर कोरोना विषाणूचा वाईट परिणाम झाला आहे. देशात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून या कार्यक्रमाला एकाही दर्शकाने हजेरी लावली नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दर्शकांना या कार्यक्रमासाठी प्रवेश नव्हता. या 'शो'मधील प्रत्येक पात्रानं लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. करोडो दर्शकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या या कॉमेडी शोबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. हा शो लवकरच बंद पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात प्रत्येक आठवड्यात नवीन पाहुणा येत असतो. या 'कॉमेडी शो'च्या माध्यमातून कपिल शर्मा आणि इतर सहकारी प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतात. कोणत्याही चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी बॉलीवूडची मोठं मोठे कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावतात. पण Tellychakkar ने दिलेल्या एका वृत्तानुसार, हा शो लवकरच ऑफ-एअर होणार आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांची निराशा झाली आहे.
हे ही वाचा-'या' मराठी अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज खिळवून ठेवेल नजर, लवकरच चाहत्यांच्या भेटीला
परंतु सध्याच्या घडीला 'द कपिल शर्मा शो' बंद होणार असला तरी कपिल पुन्हा एका नव्या लूकसह टीव्ही पडद्यावर परतणार आहे. त्यामुळे चाहत्यांना निराश होण्याची काही गरज नाही. पण त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कोरोना विषाणुमुळे प्रेक्षक शोमध्ये येऊ शकत नाहीत. त्यामुळे कपिल हा शो एका वेगळ्या रुपात दर्शकांसमोर आणणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण अद्याप सोनी चॅनेल आणि कपिल शर्मा यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
लॉकडाऊनच्या काळात 'द कपिल शर्मा शो' पूर्णपणे थांबवला गेला होता. या काळात जुन्या कार्यक्रमाचे पुनः प्रसारण करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या चार महिन्यांनंतर 1 ऑगस्ट 2020 पासून या कार्यक्रमाच्या नवीन भागांचे शुटींग सुरू करण्यात आलं होतं. कॉमेडियन कपिल शर्मा यांनी होस्ट केलेला 'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध टीव्ही शो आहे.