खलनायक म्हणून अभिनेत्री का सुचवायच्या रंजीत यांचं नाव, 'द कपिल शर्मा शो'मध्ये केला खुलासा

खलनायक म्हणून अभिनेत्री का सुचवायच्या रंजीत यांचं नाव, 'द कपिल शर्मा शो'मध्ये केला खुलासा

बॉलिवूडमधील तीन मोठ्या खलनायक रंजीत, गुलशन ग्रोवर आणि किरण कुमार यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल : सोनी टीव्हीवरील 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रत्येक आठवड्याच्या शेवटी कोणते ना कोणते सेलिब्रिटी हजेरी लावतातच. या आठवड्याच्या शेवटी या शोमध्ये बॉलिवूडमधील तीन सर्वात मोठे खलनायक दिसले.रंजीत, गुलशन ग्रोवर आणि किरण कुमार यांनी नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावत खूप धमालही केली. यावेळी या तिघांनीही आपल्या सिने करिअरमधील अनेक गुपितं प्रेक्षकांशी शेअर केली. तसेच बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता रंजीत यांनी ज्या प्रकारच्या भूमिका सिनेमात साकारल्या त्याच्या बरोबर उलट त्यांची पर्सनल लाईफ असल्याचं यावेळी सांगितलं.

रंजीत म्हणाले, 'मी जवळपास 400 सिनेमांमध्ये काम केलं आमि त्यातील जवळपास सर्वचसिनेमांमध्ये मी खलनायकाच्या भूमिका साकारल्या.मी सिनेमात एका वाईट व्यक्तीची भूमिका साकारली, एक असा माणूस जो जगातील सर्व व्यसनं करतो, दारु पितो, सिगरेट ओढतो. पण माझ्या खऱ्या आयुष्यात मी यातील कोणत्याच गोष्टीला कधीच हात लावत नाही. मी पूर्णपणे शाकाहारी आहे.' रंजीत पुढे म्हणाले, 'माझ्या आयुष्यात सुनील दत्त यांचं खूप मोठ योगदान आहे. त्यांनीच माझं गोपाळ हे खरं नाव बदलून ते रंजीत असं केलं. त्यांना वाटायचं की, माझं नाव खूप कॉमन आहे म्हणून त्यांनी ते बदलून टाकलं.'

या शोमध्ये रंजीत यांनी त्यांच्या सिने करिअरमधील एक मोठा खुलासा केला. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री खलनायक म्हणून माझं नाव सुचवत असत, असं रंजीत यांनी या शोमध्ये सांगितलं. ते म्हणाले, 'या सर्व अभिनेत्रींना माहीत होतं की, मी फक्त खलनायकाची भूमिका साकारतो. पण खऱ्या आयुष्यात मी चांगला माणूस आहे. माझ्यासोबत कम करताना त्यांना सुरक्षित वाटत असे. त्यामुळे त्या नेहमीच माझं नाव खलनायाकाच्या भूमिकेसाठी सुचवत असत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 01:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading