...म्हणून आजही सुनील गावस्करांना लोक ‘गोवास्कर’ हाक मारतात

...म्हणून आजही सुनील गावस्करांना लोक ‘गोवास्कर’ हाक मारतात

यावेळी सुनील गावस्कर शोमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. तर त्यांनी स्काइप कॉलच्या मदतीने सर्व खेळाडूंशी आणि कपिल शर्माशी गप्पा मारल्या.

  • Share this:

मुंबई, १० मार्च २०१९- ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये यावेळी १९८३ क्रिकेट वर्ल्ड कपचा संघ आला होता. कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, कृष्णमाचारी श्रीकांत, रॉजर बिन्नी, किर्ती आझाद, मदन लाल, सय्यद कृमाणी, बलविंदर संधू आणि यशपाल शर्मा या सगळ्यांनी मिळून एपिसोडला चार चाँद लावले.

सर्वच खेळाडूंना एकमेकांची मस्करी करत अनेकांचे सीक्रेट्स शेअर केले. यावेळी सुनील गावस्कर शोमध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. तर त्यांनी स्काइप कॉलच्या मदतीने सर्व खेळाडूंशी आणि कपिल शर्माशी गप्पा मारल्या. त्यांनी गोव्यावरून सर्वांना व्हिडिओ कॉल केला होता.

गप्पांच्या ओघात सुनील यांच्या आयुष्याशी निगडीत एक सीक्रेट सर्वांना कळलं. सुनील यांना गोव्याबद्दल अधिक आत्मियता असल्यामुळे, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये अनेकजण त्यांना ‘गोवास्कर’ अशी हाक मारायचे. शोमध्ये सुरुवातीपासून सुरू असलेली मस्करी शेवटपर्यंत टिकून होती. यात ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा अचानक हरभजन सिंग जजच्या खुर्चीत जाऊन बसला. हरभजन म्हणाला की, ८३ च्या वर्ल्ड कप टीमने त्याला फार प्रेरणा दिली. त्या सर्व खेळाडूंना भेटून हरभजनला फार आनंद झाला.

सध्या रणवीर सिंग ‘८३’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. हा सिनेमा १९८३ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयाची कहाणी सांगणार आहे. सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. सध्या तो या सिनेमासाठी फार परिश्रम घेत आहे. कपिल यांच्यासारखी बॉलिंग स्टाइल आणि क्रिकेटच्या ट्रिक्स शिकून घेण्यासाठी सीनिअर क्रिकेटर्सकडून ट्रेनिंग घेत आहेत.

First published: March 10, 2019, 5:05 PM IST

ताज्या बातम्या