एक दिवसासाठी पंतप्रधान झाल्यास, प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम

एक दिवसासाठी पंतप्रधान झाल्यास, प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम

एका दिवसासाठी तुला पंतप्रधान केलं गेलं तर तू सर्वात आधी काय करशील? असा प्रश्न एका चाहत्यानं नुकताच प्रभासला विचारला.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : द कपिल शर्मा शोमध्ये या आठवड्यात धम्माल पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात सर्वांच्याच गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता प्रभास या शोमध्ये हजेरी लावणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असेलेला 'साहो' सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होत असून त्याआधी 'साहो'ची स्टार कास्ट अगदी धडाक्यात सिनेमाचं प्रमोशन करण्यात बीझी आहेत. यासाठी प्रभासनं कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आणि नील नितीन मुकेश हे सुद्धा दिसले.

कपिलनं सिनेमांव्यतिरिक्त इतर वेळी फार कमी बोलणाऱ्या प्रभास शोमध्ये मात्र चांगलंच हसवलं. यावेळी कपिलनं प्रभासला अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न असा होता की, एका दिवसासाठी तुला पंतप्रधान केलं गेलं तर तु सर्वात आधी काय करशील? हा प्रश्न ऐकल्यावर एक मिनिटही न थांबता प्रभास म्हणाला, मी इंडस्ट्रीमधील मुलाखती बंद करेन. प्रभासचं हे उत्तर ऐकून खुद्द कपिल सुद्ध स्वतःला हसण्यापासून थांबवू शकला नाही. कारण स्वतः कपिल सुद्धा प्रभासची मुलाखत घेत होता. त्यामुळे प्रभासचा हा टोला कपिललाही लागू होतो.

मृत म्हणून कचऱ्यात फेकलेली 'ती' आज बिग बींच्या समोर हॉट सीटवर बसून खेळतेय KBC

प्रभास व्यतिरिक्त कपिलनं श्रद्धा कपूरला सुद्धा गंमतीदार प्रश्न विचारले. कपिल श्रद्धाला म्हणाला, शूटिंगच्या आधी तुझं पोट खराब होतं असं मी ऐकलं आहे. त्यावर श्रद्धा म्हणाली, हो, हे खरं आहे. श्रद्धाच्या या खुलाश्यावर कपिलनं संधी साधली. तो म्हणाला तरीच तु शोचं शूट सुरू होण्याआधी 3-4 वेळा वॉशरुमध्ये जाऊन आलीस.

बॉलिवूड पदार्पणाआधी हॉटेलमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री

द कपिल शर्मा शोमध्ये 'साहो'च्या संपूर्ण कास्टने खूप मस्ती केली. याचा हा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सिनेमा सुरुवातीला 15  ऑगस्टला रिलीज होणार होता मात्र आता तो 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सिनेमाचं एकून बजेट 350 कोटी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो याची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर आणि प्रभास मुख्य भूमिकेत असून, महेश मांजरेकर, चंकी पांडे, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

नशीबाचा खेळ! स्टेशनवर गाणाऱ्या रानूनं हिमेश रेशमियासोबत रेकॉर्ड केलं पहिलं गाणं

===================================================================================

300 फूट खोल सप्तकुंड धबधब्यात पडला पर्यटक; रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Published by: Megha Jethe
First published: August 23, 2019, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading