रितेश देशमुखच्या Love You मेसेजला विद्याकडून KISSING स्माईलीचा रिप्लाय, नेमका काय आहे हा प्रकार?

रितेश देशमुखच्या Love You मेसेजला विद्याकडून KISSING स्माईलीचा रिप्लाय, नेमका काय आहे हा प्रकार?

नुकतंच 'हाउसफुल 4' च्या प्रमोशन वेळी कपिल शर्मा शोमध्ये रितेशनं हा किस्सा शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 20 ऑक्टोबर :  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा 'हाउसफुल 4'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पण प्रमोशनपेक्षा हा शो या एपिसोडच्या शूटिंगमुळे चर्चेत राहिला. अक्षय कुमार रोज सकाळी लवकर उठतो या उलट कपिल शर्माच्या शोचं शूटिंग नेहमीच रात्री उशीरापर्यंत चालतं. मात्र अक्षयमुळे यावेळी या एपिसोडचं शूटिंग सकाळी ठेवण्यात आलं होतं. शनिवारी जेव्हा या शोचा एपिसोड प्रसारित झाला त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर झोप स्पष्ट दिसत होती.

या शोमध्ये सर्वच कलाकारांनी अक्षय कुमारसोबत काम करतानाचे त्यांचे अनुभव शेअर केले मात्र अभिनेता रितेश देशमुखनं मात्र सर्वांपेक्षा हटके असा अक्षयच्या प्रँकचा किस्सा शेअर केला. अक्षय कुमार प्रँकसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड स्टार्सनी अक्षयच्या प्रँकचे किस्से शेअर केले आहेत. त्यामुळेच त्याला प्रँकस्टार म्हणून ओळखलं जातं.

OMG! सलमान खानकडून एका एपिसोडचे 1 कोटी रुपये घेतो कपिल शर्मा

रितेश म्हणाला, मी आणि अक्षयनं हे बेबी सिनेमात एकत्र काम केलं आहे. त्यावेळी शूटिंग सुरू असताना एक दिवस अक्षयनं एक दिवसा माझ्या फोनवरुन विद्या बालनला I Love You असा मेसेज पाठवला. पण याबद्दल मला काहीही माहित नव्हतं. काही वेळानं विद्यानं मला किसिंग स्माईलीचा रिप्लाय दिला. त्यामुळे मी हैराण झालो. त्यानंतर मी पाहिलं तर विद्याचा फोन अक्षयच्या हातात होता.

'मला त्याच्यासोबत कारमध्येही बसायचं नाही' रणवीरबाबत दीपिकाचा अजब खुलासा

अक्षयचा 'हाउसफुल 4' येत्या 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त बॉबी देओल, चंकी पांडे, कृती सेनन, कृती खरबंदा, पूजा हेगडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा हाउसफुल फ्रेंचाइजीतील 4 पार्ट आहे. याआधी आलेल्या तिन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे. त्यामुळे आता या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

ती सध्या काय करते? Viral Video मुळे चर्चेत आलेल्या रानू मंडल आता आहेत तरी कुठे

================================================================

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

Published by: Megha Jethe
First published: October 20, 2019, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading