OMG! सलमान खानकडून एका एपिसोडचे 1 कोटी रुपये घेतो कपिल शर्मा

OMG! सलमान खानकडून एका एपिसोडचे 1 कोटी रुपये घेतो कपिल शर्मा

कपिलचा शो बंद झाल्यानंतर त्याला लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होतं.

  • Share this:

मुंबई, 20 ऑक्टोबर : सोनी टीव्हीवरील कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सकाळी 7 वाजता शूटिंग ठेवल्यानं या शोची सगळीकडेच खूप चर्चा झाली. अक्षय कुमार रोज सकाळी लवकर उठतो याउलट कपिल शर्माच्या शोचं शूटिंग नेहमीच रात्री उशीरापर्यंत चालतं. मात्र अक्षयमुळे यावेळी या एपिसोडचं शूटिंग सकाळी ठेवण्यात आलं होतं. शनिवारी जेव्हा या शोचा एपिसोड प्रसारित झाला त्यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर झोप स्पष्ट दिसत होती. तर या पूर्वी चंकी पांडे तर या शोच्या शूटिंगच्यावेळी झोपले नव्हते. तसेच पार्श्वगायक उदित नाराण यांनी सुद्धा या शोमध्ये सहपरिवार हजेरी लावली. उदित नारायण जसे या शोमध्ये आले त्यावेळी सर्वांच्या मनात त्यांचा एक प्रश्न पुन्हा एकदा आला की एका एपिसोडसाठी कपिल शर्मा एका एपिसोडसाठी किती पैसे घेतो.

उदित नारायण या आधीही या शोमध्ये येऊन गेले होते. जेव्हा ते पहिल्यादा आले होते त्यावेळी कपिलनं त्यांना म्हटलं, उदितजींचा आवाज जेवढा गोड आहे त्यापेक्षा त्यांचा चेहरा निरागस आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं की त्यांनी आजपर्यंत कोणाचाही पैसे थकबाकी ठेवलेला नाही पण सर्वांनी त्यांचे पैसे द्यायचे मात्र ठेवले आहेत. त्यावर उत्तर देताना उदितजी म्हणाले, तुला तर काही त्रास नसेल. ऐकलं आहे की तु आजकाल एका एपिसोडसाठी 1 कोटी रुपये फी घेतोस.

ती सध्या काय करते? Viral Video मुळे चर्चेत आलेल्या रानू मंडल आता आहेत तरी कुठे

एका एपिसोडसाठी 1 कोटी घेतो कपिल शर्मा उदित नारायण यांचा खुलासा

उदित नारायण यांनी एका एपिसोडसाठी कपिल शर्मा 1 कोटी घेतो असं म्हटल्यावर यावर कपिलनं काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र त्यानंतर अनेक ठिकाणी त्याच्या फीच्या चर्चा सुरू झाल्या. याआधी कपिल टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक कर भरल्यानं चर्चेत आला होता. एवढंच नाही तर अक्षय कुमारसोबत नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये आपल्या कमाईबद्दल बोलताना माझी कमाई अक्षय पेक्षा कमी नाही असं म्हटलं होतं. तसेच मी सुद्धा जास्त टॅक्स भरला असं देखील तो म्हणाला.

कपिल शर्माला झालं होतं लाखोंचं नुकसान

द कपिल शर्मा शोच्या कलाकारांबाबत दैनिक भास्करनं सविस्तर वृत्त प्रकाशित केलं होतं. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार कपिलचा शो बंद झाल्यानंतर त्याला लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होतं. अगदी सुरुवातीला कपिल एका एपिसोडसाठी 60 ते 70 लाख रुपये फी घेत असे. त्यावेळी उदित नारायण यांनी केलेल्या वक्तव्यात बरंच सत्य होतं.

दिशा पाटनीसारखी परफेक्ट फिगर हवीय? मग फॉलो करा तिच्या डाएट टीप्स

मात्र शो बंद झाल्यानंतर जेव्हा पुन्हा सुरू झाला त्यावेळी त्यावेळी त्याची फी कमी करुन 15-20 लाखांवर आली. कॉमेडी नाइट्स विथ कपिल त्यावेळी टीआरपीमध्ये नंबर वन होता आणि मोठ-मोठे सेलिब्रेटी त्यावेळी त्याच्या शोमध्ये येत असत. पण नंतर तो शो बंद झाला आणि द कपिल शर्मा शो सुरू करण्यात आला. हा शो सुद्धा ठिक चालला पण कपिलची तब्बेत आणि त्याच्या काही खासगी कारणांमुळे हा शो सुद्धा बंद करण्यात आला. त्यानंतर फॅमिली टाइम विथ कपिल आला आणि हा शो सुपरफ्लॉप झाला. त्यानंतर या सर्वांचा प्रभाव सरळ कपिल शर्माच्या फीवर पडला. जेव्हा त्यानं पुन्हा एकदा शो सुरु केला त्यावेळी त्याची फी बरीच कमी करण्यात आली होती. पण प्रोड्युसर म्हणून सलमान खाननं त्याला साथ दिली आणि आता कपिलनं टीआरपीमध्ये पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये स्थान मिळवलं आहे.

कृष्णा अभिषेक आणि भारती यांची फी सुद्धा नाही कमी

रिपोर्टनुसार टीव्ही कृष्णा अभिषेक आणि भारती सिंह यांचाही खूप चांगला फॅन फॉलोइंग असल्यानं या दोघांची एका एपिसोडची फी सुद्धा 10 लाखांच्या आसपास आहे. सलमान या शोचा प्रोड्युसर झाल्यानंतर या शोमध्ये अनेक बदल झाले आहेत.

लग्नाच्या 20 व्या वाढदिवशी माधुरी दीक्षितचा KISSING सेल्फी व्हायरल!

=============================================================================

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

Published by: Megha Jethe
First published: October 20, 2019, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading