मुंबई, 12 एप्रिल : आलिया भट आणि वरुण धवनचा 'कलंक' येत्या 17 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं नुकतीच 'कलंक'च्या टीमनं 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडचा प्रोमो कपिल शर्माच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला. ज्यात सर्व कलाकार एकमेकांशी मस्ती करताना दिसत आहेत. या शोमध्ये कपिलनं वरुण, आलिया आणि सोनाक्षी यांना जर त्यांना निवडणूक लढवली तर त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय असेल असा प्रश्न विचारला ज्याची या तिघांनीही फार मजेशीर उत्तरं दिली.
This weekend team #kalank in #TheKapilSharmaShow @aliaa08 @sonakshisinha @Varun_dvn @AdityaRoyKapoor @SonyTV #Elections2019 pic.twitter.com/PAGLBM7viK
— कपिल शर्मा (@KapilSharmaK9) April 11, 2019
सध्या कपिल शर्मा शो मधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर खीप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा वरुण, आलिया आणि सोनाक्षीला तुम्ही निवडणूक लढवली तर त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय असेल असा प्रश्न विचारताना दिसत आहे. याच उत्तर देताना वरुण सांगतो माझ्या पक्षाचं चिन्ह कच्छा (पोतडी) असेल. कारण त्यात घुसण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. तर आलियानं सांगितलं कि माझं चिन्ह असेल थाळी कारण राजकारणात चमचे खूप असतात. या दोघांनंतर सोनाक्षीनं खूपच वेगळं उत्तर दिलं ती म्हणाली माझ्या पक्षाचं चिन्ह शांततेच चिन्ह असेल म्हणजे पक्ष बोलणार नाही फक्त काम करेल.
View this post on Instagram
जालंधर सत श्री अकाल. Was amazing to be greeted by our airforce when we landed. #india
कपिल शर्मा शोमध्ये कलंकच्या टीमनं खूप मस्तीही केली. 17 एप्रिलला रिलीज होत असलेल्या या सिनेमात आलिया भट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त, कुणाल खेमू अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे आता प्रेक्षकांना या सिनेमाची प्रतीक्षा आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा