चक्क अक्षय- शिल्पाचं हे गाणं ऐकून झोपायचा टायगर, जॅकी श्रॉफनेच केला खुलासा

सर्वसामान्यपणे एखाद्या लहान मुलाला जर झोपवायचं असेल तर तुम्ही आम्ही त्याला एखादं अंगाई गीत गाऊन दाखवतो किंवा बडबड गीतही गातो. पण तुम्ही कधी ताल धरायला लावणाऱ्या गाण्यावर मुलांना शांत झोपताना पाहिलं आहे का?

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 08:12 PM IST

चक्क अक्षय- शिल्पाचं हे गाणं ऐकून झोपायचा टायगर, जॅकी श्रॉफनेच केला खुलासा

मुंबई, 2 मे- सर्वसामान्यपणे एखाद्या लहान मुलाला जर झोपवायचं असेल तर तुम्ही आम्ही त्याला एखादं अंगाई गीत गाऊन दाखवतो किंवा बडबड गीतही गातो. पण तुम्ही कधी ताल धरायला लावणाऱ्या गाण्यावर मुलांना शांत झोपताना पाहिलं आहे का? पण बॉलिवूडमधला असा एक स्टार आहे जो दररोज एकच ठराविक गाणं ऐकत झोपायचा.

Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस

कपिल शर्माच्या द कपिश शर्मा शोमध्ये जॅकी श्रॉफने त्याचा मुलगा आणि बॉलिवूडचा स्टार अभिनेता टायगरची एक सवय सर्वांना सांगितली. टायगर अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या मैं खिलाडी तू अनारी या सिनेमातील ‘चुराके दिल मेरा...’ हे गाणं ऐकूनच झोपायचा. जॅकी यांच्या या गौप्यस्फोटानंतर कपिलने त्यांना आता टायगर कोणतं गाणं ऐकून झोपतो असा प्रश्न विचारला.

डिंपल कपाडिया सोबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अखेर बोलला सनी देओल

याचं उत्तर देताना जॅकी म्हणाले की, ‘आता तो जिमवरूनच फार थकून येतो. त्यामुळे त्याला आता झोपताना कोणत्याही गाण्याची गरज लागत नाही.’ जॅकी पुढे म्हणाले की, एकवेळ अशी होती की, तेव्हा तो स्वतःचं मन शांत करण्यासाठी मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांची गाणीही ऐकायचा.

Loading...

VIDEO-...म्हणून आईचा हात सोडून आराध्या बाबा अभिषेककडे पळत गेली

टायगर श्रॉफच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो 'स्टूडंट ऑफ दी इअर 2' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोन नवोदित नायिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. 'स्टूडंट ऑफ दी इअर' सिनेमाचा हा सिक्वल असणार आहे. पहिल्या सिनेमातून सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि वरुण धवनने बॉलिवूडमध्ये ग्रॅण्ड एण्ट्री केली होती.

सेटवर बाळाला दुध पाजताना अभिनेत्रीचा फोटो व्हायरल, युजर्स म्हणाले...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...