मुंबई 26 मार्च: ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. हा शो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळवून हसवण्यासाठी येत आहे. मात्र यावेळी या शोमध्ये नेहमीच्या कलाकारांसोबतच काही नवे चेहरे देखील पाहायला मिळणार आहेत. अर्थात हे नवे कलाकार कोण असतील याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या शोमध्ये आता तुम्हाला देखील भाग घेता येऊ शकतो. (Kapil Sharma) कपिलसोबत काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व चाहत्यांसाठी निर्मात्यांनी एक नवी घोषणा केली आहे.
नेमकं काय म्हणाले निर्माते?
“कपिल शर्माची टीम सध्या नव्या कलाकारांचा शोध घेत आहे. ज्या कलाकारांना किंवा लेखकांना कपिलसोबत काम करण्याची इच्छा आहे. त्यांनी http://banijayasia.com या वेब साईटवर लॉगईन करुन आपली माहिती द्यावी. जर त्यांचं काम चांगलं असेल तर त्यांना थेट कपिलच्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळेल.” अशा आशयाचं ट्विट करुन निर्मात्यांनी नवी घोषणा केली आहे. त्यांचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अवश्य पाहा - सुशांतची बहिण अडकली संकटात; रियाची तक्रार मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
#ANNOUNCEMENTALERT Kapil Sharma show ki team dhoond rahi hain actors & writers - ye hai aapka mauka poore Hindustaan ko hasaane ka. Click on https://t.co/hTJ5IV8ooZ to know more! #TKSS @KapilSharmaK9 pic.twitter.com/XIs1XTFvq5
— Banijay Asia (@Banijayasia) March 25, 2021
सलमान खान टेलीव्हिजनचे सीईओ नदीम कोरीशी यांनी सांगितलं की, ‘कपिल शर्मा आणि त्यांच्या शोचे अन्य कलाकार देशभरात या शोमुळे ओळखले जातात. आम्ही प्रेक्षकांना काही नावीन्यपूर्ण आणि रोमांचक देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. टीमचे आताचे आणि नव्याने जोडले जाणाऱ्या सर्व लोकांचा उद्देश्य हा फक्त मनोरंजन असणार आहे’.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kapil sharma, The kapil sharma show, Tv serial