बाथटबमध्ये जखमी अवस्थेत दिसली परिणीती, वाचा नक्की काय झालं

बाथटबमध्ये जखमी अवस्थेत दिसली परिणीती, वाचा नक्की काय झालं

या फोटोमध्ये तिच्या कपाळावर जखम झालेली दिसत असून त्यातून रक्त वाहत असलेलं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑगस्ट : अभिनेत्री परिणीती चोप्रा मागच्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत तिनं तिच्या ब्रेकअप आणि त्यानंतरच्या डिप्रेशन विषयीचा खुलासा केला होता. नुकताच जबरियां जोडी हा तिचा सिनेमा रिलीज झाला ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तिनं तिच्या नव्या प्रोजेक्टची तयारी करत आहे. लवकरच ती 'द गर्ल ऑन द ट्रेन' या हॉलिवूड सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. पण त्यापूर्वी सध्या परिणीतीचा जखमी अवस्थेतील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला परिणीतीच्या या फोटोमध्ये ती बाथटबमध्ये बसलेली असून ती जखमी अवस्थेत असलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर जखम झालेली असून त्यातून रक्त वाहताना दिसत आहे. तसेच परिणीतीच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसत आहेत. पण घाबरू नका कारण परिणीती खरी खुरी जखमी झालेली नाही तर हा तिचा 'द गर्ल ऑन द ट्रेन' या हिंदी रिमेकमधील फर्स्ट लुक आहे. परिणीतीनं नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा फोटो शेअर केला. या फोटोला तिनं, हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठिण भूमिका असल्याचं म्हटलं आहे.

(वाचा : KBC चा पहिला करोडपती सध्या काय करतो? 19 वर्षात 'असं' बदललं आयुष्य)

 

View this post on Instagram

 

Something I’ve never done before. And the most difficult character I have ever played in my life.💥 #FirstLook #TheGirlOnTheTrain @reliance.entertainment @sarkarshibasish @amblin

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

हा मूळ हॉलिवूड सिनेमा पॉल हॉकिन्सचं बेस्ट सेलर पुस्तक 'द गर्ल ऑन द ट्रेन'वर आधारित आहे. स्टीवन स्पिलबर्ग यांनी या पुस्तकावरून सिनेमाची निर्मिती केली. यात हॉलिवूड अभिनेत्री एमिली ब्लंट मुख्य भूमिकेत होती. याच्या हिंदी रिमेकमध्ये परिणीती दारुच्या नशेत बुडालेल्या घटस्फोटीत महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. जी एका हरवलेल्या व्यक्तीच्या शोधात समील होते. ऋभु दासगुप्ता या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

(वाचा : सलमान खानच्या अभिनेत्रीनं मादक अदांनी केलं घायाळ, BOLD फोटोशूट VIRAL)

काही दिवसांपूर्वी एका परिणीती चोप्रानं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं, ‘मी एक अशी भूमिका साकारणार आहे जी करताना मला आतापर्यंत माझ्या ऑडियन्सनी पाहिलेलं नाही. मला स्वतःला अशा भूमिका साकारायला खूप आवडतात. ज्यात जास्त मेहनत आणि तयारी करावी लागते. या सिनेमात मला जी भूमिका साकारयची आहे. ती खूप आव्हानात्मक आहे आणि मी याआधी असं काहीही केलेलं नाही.’ तिच्या या सिनेमातील फर्स्ट लुक वरून तर या सिनेमात ती काहीतरी हटके करणार आहे हे स्पष्ट केलं.

(वाचा : Sacred Games-2 मुळे उडाली यूएईतल्या 'या' व्यक्तीची झोप, वाचा कारण)

परिणीती सांगते, ‘मी खूपच उत्सुक आहे. कारण, एका बेस्ट सेलर पुस्तकावर आधारित असेल असं काही करेन असा विचार मी कधीच केला नव्हता.’ मी या भूमिकेला स्वतःशी जोडून ठेऊ शकते कारण मी लंडनमध्ये अभ्यास आणि काम केलं आहे. त्यामुळे ते माझं दुसरं घर आहे. त्यामुळे मी या सिनेमाचं शूटिंग सुरू कधी होतंय याची वाट पाहत आहे.

============================================================

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या