SSR Death Case: वाद पेटला! बिहारचा FIR राजकीय हेतूने, मुंबई पोलिसांचा कोर्टात आरोप

SSR Death Case: वाद पेटला! बिहारचा FIR राजकीय हेतूने, मुंबई पोलिसांचा कोर्टात आरोप

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 8 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांना जोरदार सुरुवात झालीय. राजकीय आरोपांचा धुराळा उठला असतांनाच आता महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांमध्ये आरोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणी बिहार पोलिसांनी दाखल केलेला FIR हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारचा आरोप सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका शपथपत्रात केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोर्टात आता नवा संषर्घ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

The FIR of Bihar Police is for political motives  affidavit of Mumbai Police in the Supreme Court mhak

"In the present facts and circumstances of the present case, the FIR ought to be transferred as a Zero FIR to the Bandra Police Station, Mumbai," Maharashtra police stated in its reply before the Supreme Court today. https://t.co/oGbVs0UZyg pic.twitter.com/l90njZUtl4

— ANI (@ANI) August 8, 2020

दरम्यान रियाच्या याचिकेविरोधात सुशांतच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर असा आरोप केला आहे की, तिने या प्रकरणातील साक्षीदारांना प्रभावित करण्यास सुरुवात केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाची याचिका फेटाळण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. जर रियाने स्वत: सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, तर सीबीआय चौकशी का टाळली जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 9, 2020, 12:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या