मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

चाहत्याचा 12 वर्षांचा त्रास अवघ्या काही तासात केला कमी; अभिनेता सोनू सूदची अशीही किमया

चाहत्याचा 12 वर्षांचा त्रास अवघ्या काही तासात केला कमी; अभिनेता सोनू सूदची अशीही किमया

अनेकांसाठी सोनू सूद हा त्यांच्या आयुष्यातील Real Hero ठरला आहे

अनेकांसाठी सोनू सूद हा त्यांच्या आयुष्यातील Real Hero ठरला आहे

अनेकांसाठी सोनू सूद हा त्यांच्या आयुष्यातील Real Hero ठरला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) आपल्या चाहत्यांना मदत करतो तेव्हा आता आश्चर्य वाटतं नाही. कोरोना काळात, अभिनेत्याने असं काम केलं आहे की सर्वांसाठी तो मोठा आधार बनला आहे. एक असा आधार जो प्रत्येकास मदत करण्यास तयार असतो. अभिनेत्याने आपल्या कामाने बर्‍याच लोकांची मने जिंकली आहेत. कधी त्याने एखाद्यासाठी घर बांधलं तर कधी अभ्यासासाठी निधी दिला.

सोनू सूदची चाहत्यांना मदत

आता सोनू सूदने आणखी एका फॅनला मदत केली आहे. सोनूचा एक चाहता गेल्या 12 वर्षांपासून अडचणीत होता. पैशाअभावी त्यांची शस्त्रक्रिया होऊ शकत नव्हती.  त्याने जगण्याची आशाच गमावली होती. पण त्या कठीण प्रसंगी सोनू सूदने या चाहत्याचा हात धरला आणि 11 तासांत त्याचा 12 वर्षांचा त्रास कमी केला. एका डॉक्टरने सोशल मीडियावर ट्वीट करून त्या फॅनचे हेल्थ अपडेट दिले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की - अमनजीत आता बरा होत आहे. त्याच्यावर 11 तास लांब न्यूरो शस्त्रक्रिया झाली. धन्यवाद सोनू सूद ते सतत आमच्या संपर्कात होते. ऑपरेशननंतरही ते आमच्याशी बोलत होते.

हे ही वाचा-Drug Case: जामीन मिळाल्यानंतर सेटवर पोहोचली भारती, पहिल्यांदा शेअर केली ही पोस्ट

जेव्हा सोनू सूदला आपल्या चाहत्याचे हे हेल्थ अपडेट आले तेव्हा त्याला खूप आनंद झाला. सोशल मीडियावर ट्विट करुन त्याने आनंद व्यक्त केला. ट्विटमध्ये सोनूने लिहिले की - ही आजची सर्वात चांगली बातमी आहे. 12 वर्षांची वेदना 11 तासांत बरी झाली. सोनूचे हे ट्विट व्हायरल झाले असून चाहतेही त्याच्या काम करण्याच्या पद्धतीवर फिदा आहेत. याआधीही अभिनेत्याने गरजू लोकांना अशाच प्रकारे मदत केली आहे. त्याने प्रत्येकाच्या आयुष्यात असेच बदल घडवून आणले आहेत.

सोनूचा जबरा फॅन

अलीकडेच अभिनेत्याचा एका चाहता त्याच्यावर इतका प्रभावित झाला की त्याने बिहार ते मुंबईपर्यंत प्रवास सायकलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सोनूने त्या चाहत्यासाठीही विमानाची व्यवस्था केली आणि त्याचे व्हीआयपीमध्ये स्वागत केले. तो चाहत्यांनाच भेटला नाही तर त्याचा ऑटोग्राफही दिला. ते क्षण सोशल मीडियावर ट्रेंड झाले होते.

First published:

Tags: Bollywood, Sonu Sood