पाटना, 9 जुलै : Ratan Raajputh Video: कधी दूरचित्रवाणीच्या जगतात आपली मजबूत ओळख निर्माण करणारी रतन राजपूत (Ratan Raajputh) हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गावात एका शेतात काम करताना दिसत आहे. रतनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोकही हैराण झाले आहेत. अभिनेत्री अभिनय सोडून गावात का भटकत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रतन राजपूतचा हा व्हिडीओ..
रतन राजपूत (Ratan Raajputh) टिव्ही क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रतन नेहमीच ग्लॅमरपासून लांब राहिली. तिला साधं राहणं अधिक आवडतं. तुम्ही तिला अधिकतर मेकअपशिवाय पाहाल. रतनाला तिचं गाव खूप आवडतं. जेव्हा कधी इच्छा होते, ती आपल्या गावी जाते. तिने आपल्या गावचे अनेक व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर शेअर केले आहेत. आताच्या या व्हिडीओमध्ये रतन बिहारमधील आपल्या गावी फेरफटका मारताना दिसत आहे.
रतनने केली शेती..
रतन राजपूतच्या (Ratan Raajputh) एका व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बिहारमधील आवाडी (Anwarhi) गावात ती फेरफटका मारत आहे. गावात रस्त्यात सती देवीचं मंदीर लागतं. तेथे जाऊन ती दर्शन घेते. रतनने सांगितलं की, ती महाराष्ट्रातील एका गावात राहिली होती. गावात तिने कांदा आणि हळदीची शेतीही केली. याशिवाय रतन सांगते की, तिला गावातील आयुष्य खूप आवडतं. गावातील आयुष्य जगण्यासाठी ती शेतीही करते.
करिअरबद्दल सांगायचं झालं तर रतनने ‘संतोषी मां- सुनिए व्रत कथाएं’ या मालिकेत काम केलं आहे. 2020 मध्ये हा शो ऑनएअर झाला होता. यानंतर ती पुन्हा कोणत्याही मालिकेत दिसली नाही. त्यामुळे ती इंडस्ट्री सोडण्याचा विचार करीत आहे. असं असलं तरी यूट्यूबवर ती बरीच सक्रीय असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tv actress, TV serials