मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

...तेव्हा Samantha Prabhu ने सेक्ससाठी खाणंही सोडलं; Food ऐवजी निवडलं होतं Sex

...तेव्हा Samantha Prabhu ने सेक्ससाठी खाणंही सोडलं; Food ऐवजी निवडलं होतं Sex

घटस्फोट आणि आता करिअरमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री समंथा प्रभू (Samanthaprabhu) आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

घटस्फोट आणि आता करिअरमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री समंथा प्रभू (Samanthaprabhu) आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

घटस्फोट आणि आता करिअरमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री समंथा प्रभू (Samanthaprabhu) आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे.

मुंबई, 30 नोव्हेंबर : अभिनेता नागा चैतन्यशी (Naga chaitanya) घटस्फोटानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री (South actress) समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) करिअरने वेग धरला आहे. लाखो प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन असणारी समंथा बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही पदार्पण करत आहे. त्यामुळे समंथा चांगलीच चर्चेत आहे. तिच्या एका जुन्या मुलाखतीची (Samantha prabhu interview) चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये तिला सेक्स आणि फूड यापैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आला. यावेळी अभिनेत्रीने जे निवडलं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला (Samantha prabhu sex or food video).

समंथाने 2017 मध्ये, 'जस्ट फॉर वुमन'ला (Just For Woman) एक मुलाखत दिली होती. मुलाखतीत रॅपिड फायर राउंडमध्ये तिला अवघड प्रश्नाला सामोरं जावं लागलं होतं. समंथला सेक्स आणि फूड असे दोन पर्याय देण्यात आले होते. या दोघांपैकी एकाची निवड तिला करायची होती. या प्रश्नाचं उत्तर देण्यास समंथा सुरुवातीला खूप संकोच करत होती, अशी निवड करणं फारच कठीण असल्याचं तिनं सांगितलं. मात्र फारच आग्रह केल्यानंतर तिनं याचं उत्तर दिलं, जे खूपच आश्चर्यकारक होतं. तिने सेक्स आणि फूड या पर्यायांमधून सेक्सची निवड केली.

" isDesktop="true" id="637227" >

आर ट्रेडिंग यु ट्युब चॅनेलवरही समंथाचा मुलाखतीतील हा व्हिडीओ पोस्ट केलेला आहे. 'सेक्स. मी कोणत्याही दिवशी उपाशी राहू शकेन.', असं ती म्हणाली.

हे वाचा - Sai Pallavi ते Samantha 'या' अभिनेत्रींनी अजूनही केलं नाही कन्नड सिनेमात काम

समंथाने अलीकडेच 'द फॅमिली मॅन-2' या हिंदी वेबसीरिजमध्ये (The Family Man-2) अत्यंत आव्हानात्मक भूमिका यशस्वीपणे साकारून यशाचं नवीन शिखर गाठलं. यामध्ये तिने श्रीलंकन नक्षलवादी तरुणीची भूमिका साकारली होती. यात तिचे काही बोल्ड सीन होते. समंथाच्या या भूमिकेचं सर्वांनीच खूप कौतुक केलं. मनोज वाजपेयीसारखा (Manoj Bajpeyee) कसलेला अभिनेता समोर असूनही, समंथानं आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटवला.  यामुळे बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडचे दरवाजेही तिच्यासाठी खुले झाले.

व्यावसायिक आघाडीवर यशस्वी ठरलेली समंथा कौटुंबिक आघाडीवर अयशस्वी ठरल्यानं चर्चेत आली होती. ती आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी अलीकडेच आपण विभक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. समंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नाला तीन वर्षं झाल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली सर्वांत सुंदर आणि आदर्श मानली जाणारी ही जोडी वेगळी झाल्यानं चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली होती. समंथा आणि नागा चैतन्य यांच्या विभक्त होण्यामागच्या कारणांची सतत चर्चा सुरू असते.

हे वाचा - घटस्फोटापूर्वी समंथा-नागाचं सुरु होतं 'बेबी प्लॅनिंग'; वाचा सविस्तर

विभक्त झाल्यानंतर, समंथाने तिच्या घटस्फोटावरून (Divorce) होत असलेल्या चर्चेला उत्तर देताना एक दीर्घ पोस्ट लिहिली होती आणि त्यात विभक्त होण्यामागच्या कारणांचा जो अंदाज लावला जात होता, त्याबाबत तिनं खुलासा केला होता. 'लोक म्हणतात की माझं अफेअर होतं, मला मूल नको आहे, मी संधीसाधू आहे, माझा गर्भपात झाला आहे; पण घटस्फोट ही एक अत्यंत क्लेशदायक प्रक्रिया आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मला वेळ द्या. माझ्यावर हा मोठा आघात आहे; पण मी याने मोडणार नाही, हे माझे वचन आहे,' असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

First published:

Tags: Actress, Entertainment, Food, South actress