वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

सगळ्यात लोकप्रिय ब्रेक डान्सर आणि गायक मायकल जॅक्सनवरून कायम वादात राहिलेल्या त्याच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा एक नवा आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : सगळ्यात लोकप्रिय ब्रेक डान्सर आणि गायक मायकल जॅक्सनवरून कायम वादात राहिलेल्या त्याच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा एक नवा आरोप केला आहे. मायकलला नपुंसक बनवण्यामागे त्याच्या वडिलांचा हात असल्याचा आरोप मायकलच्या डॉक्टरांनी केला आहे. मायकलचे वडिल जोई आणि त्याच्या कुंटुबियाने त्याचा गाण्याचा सुरू कायम ठेवण्यासाठी त्याच्यावर केमिकलचा वापर केला आणि त्याला नपुंसक बनवलं.

मायकेल जॅक्सनच्या मृत्यू प्रकरणात अजाणतेपणे त्याला मारण्यात आल्याच्या आरोपात दोषी कोनार्ड मुरेचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या व्हिडिओवरून मोठी खळबळ माजली होती. हा व्हिडिओ 'द ब्लास्ट'ने प्रसिद्ध केला होता. या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर कोनार्ड मुरे तब्बल 2 वर्ष कारागृहात होता.

VIDEO : जखमी तरुणांची जगण्यासाठी याचना पण लोकं सेल्फी काढत होते !

2009 साली रहस्यमय पद्धतीने मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला होता. त्याच्या जाण्याने अवघ्या हॉलिवूड आणि बॉलिवूमध्ये शोककळा पसरली होती. मायकलने त्याच्या ब्रेक डान्स आणि रॉक म्यूजिकने सगळ्यांचीच मन जिकंली होती.

एवढ्या मोठ्या कलाकाराला नपुंसक बनवल्यामुळे मुरेने देखील मायकलच्या वडिलांना सगळ्यात वाईट वडिल असं म्हटलं आहे. मायकलचे वडिल त्याच्यावर अत्याचार करतात असा आरोपही मरेने लावला होता. गाण्याचे दिर्घकाळ सुर लावण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला केमिकल देणाऱ्या बापाच्या मरण्यावर मला रडू देखील येणार नाही अशा कठोर शब्दात मुरेने जोई यांच्यावर आरोप केले होते.

यासंदर्भात 2010मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण काही दिवसांनंतर मागे घेण्यात आला. त्यानंतर मागच्या महिन्यात वयाच्या 89व्या वर्षी मायकलचे वडिल जोई यांचं निधन झालं.

हेही वाचा...

VIDEO : पुणे तिथे काय उणे,अख्खा बंगला जॅक लावून 4 फूट उचलला

पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

माणुसकीला काळिमा, ओळखीच्याच इसमाने साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर केला लैंगिक अत्याचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 09:22 AM IST

ताज्या बातम्या