Home /News /entertainment /

मायलेकीत येणार दुरावा, नेहा परीला सोडून जाणार लंडनला

मायलेकीत येणार दुरावा, नेहा परीला सोडून जाणार लंडनला

सध्या मराठी मालिका चांगल्याच गाजत आहेत. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ( mazi tuzi reshimgath ) मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यश आणि नेहाची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. याशिवाय या मालिकेतील छोटी परी देखील प्रेक्षकांची तितकीच आवडती आहे

पुढे वाचा ...
  मुंबई, 6 मे-  सध्या मराठी मालिका चांगल्याच गाजत आहेत. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ( mazi tuzi reshimgath ) मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यश आणि नेहाची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. याशिवाय या मालिकेतील छोटी परी देखील प्रेक्षकांची तितकीच आवडती आहे. छोट्या परीची (Pari) भूमिका बालकलाकार मायरा वैकुळने (myra vaikul) साकारली आहे. मायरा तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचे मन जिंकताना दिसते.मालिकेत सध्या फारच रंजक वळण आलं आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा नवा प्रोमो नुकतंच प्रसारित झाला आहे. यामध्ये नेहाला आपल्या लाडक्या परीपासून काही दिवस दूर जावं लागणार आहे. त्यामुळे नेहा फारच चिंतेत आहे. परंतु नेमकं काय घडलं? नेहा परीपासून दूर कुठे निघाली आहे? असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. तर आम्ही तुम्हाला याबद्दलच सांगू इच्छितो. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोनुसार मालिकेत परी आणि नेहाची काही दिवसांसाठी ताटातूट झालेली पाहायला मिळणार आहे. वास्तविक नेहाला ऑफिसच्या एका महत्वाच्या कामासाठी लंडनला जावं लागणार आहे. आणि यावेळी तिला परीला इथेच ठेऊन जावं लागणार आहे. त्यामुळे नेहा प्रचंड तणावात आहे. दरम्यान यश आणि त्याचं कुटुंबीय परीची काळजी घ्यायची जबाबदारी आपल्याकडे घेतात. आणि त्यांनतर नेहाला लंडनला जायला तयारदेखील करतात.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  मालिकेतील चिमुकली परीसुद्धा फारच समजूतदार आहे.आपल्या आईला अर्थातच नेहाला वाईट वाटू नये. किंवा तिला टेन्शन येऊ नये यासाठी ती आपल्याला काहीच अडचण नाही असं दाखविते आणि तिला जाण्याची परवानगी देते. नेहा लंडनला जाणार का?नेहा गेल्यानंतर यश आणि त्याचं कुटुंब परीची योग्य काळजी घेऊ शकेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या