चाहत्यांचं प्रेमच ते; सुशांतच्या आठवणीत बांधला त्याच्या नावाचा चौक

चाहत्यांचं प्रेमच ते; सुशांतच्या आठवणीत बांधला त्याच्या नावाचा चौक

सुशांतच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत

  • Share this:

पूर्णिया, 10 जुलै : महानगरपालिकेने अत्यंत जुन्या फोर्ड कंपनी चौकाचे नाव बदलून सुशांत सिंह राजपूत चौक असे केले आहे. याशिवाय मधुबनी चौक ते माता स्थान चौक या नव्याने बांधलेल्या रस्त्याचे नाव सुशांत सिंह राजपूत पथ असेही ठेवण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या महापौर सविता देवी यांनी स्वत: या चौकाचे उद्घाटन केले.

महामंडळाच्या स्थायी समितीत प्रस्ताव झाला पास

महापौर सविता देवी म्हणाल्या की, सुशांत सिंह राजपूत यांनी अगदी लहान वयात संपूर्ण देश आणि बिहारचे नाव रोशन केले आहे. त्याचे अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिका जनतेने पाहिल्या आहेत आणि त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. तो एक उत्कृष्ट कलाकार होता. आपल्या कौशल्यामुळे त्याने बॉलिवूडमध्ये छाप सोडली आहे. त्याच्या मृत्यूबद्दल त्याच्या चाहत्यांना खूप खेद वाटत आहे.

हे वाचा-सुशांतचं शेवटचं गाणं केवळ 11 लोकांनी पाहिलं? युट्यूबवरील VIEWS अचानक गायब

लोकांची मागणी लक्षात घेता पाच दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. यानंतर सुशांत सिंह राजपूत याचे नाव फोर्ड कंपनी चौकचे नाव बदलण्यात आले आहे. तसेच मधुबनी मार्केट ते माता ठिकाणापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे नाव सुशांत सिंह राजपूत याच्या नावावर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत पूर्णियाच्या बरहरा कोठी ब्लॉकच्या मलडीहाचा राहणारा होता.

Published by: Meenal Gangurde
First published: July 10, 2020, 8:52 PM IST

ताज्या बातम्या