मुंबई, 5 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून सिंहिनी भाषेतील मनिके मागे हिथे (Manike Mage Hithe)हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्याच्या संगीत लयाने सर्वांना अक्षरशः वेड लावले आहे. अशातच अनेक कलाकार या गाण्याच्या तालाचा भन्नाट उपयोग करताना दिसत आहेत. त्याचे नव नवे व्हर्जन ऐकायला मिळत आहेत. यामध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Me Nandayla) मधील काही कलाकारांचादेखील समावेश पाहायला मिळत आहे. सध्या त्यांचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असून पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊल ठेपली आहे. अशातच शकुची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी मालिकेचा निरोप घेतला आहे. आणि त्यांच्या जागी अभिनेत्र किशोरी अंबिये यांनी मालिकेत प्रवेश केला आहे.
दरम्यान, मालिकेत प्रवेश होताच त्या सेटवर इतर कलाकारांमध्ये चांगल्याच रमल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेतील स्विटू, नल्लू मावशी आणि शकु म्हणजेच किशोरी अंबिये यांचा ऑफस्क्रिन व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या तिघींनी, मनिके मागे हिथे गाण्याचा नवा व्हर्जन तयार केले असल्याचे पाहायला मिळत आहे.
स्विटू या गाण्याची सुरुवात करते पण मागूल सूर ओढत शकु म्हणजेच किशोरी अंबिये या अभिनेत्र श्रीदेवीचे नाव तालात घेतात तर, हा मला गावाला जायचं ना, त्या गावात पाटिल ना असा सुर ओढत शकु, नल्लू आणि स्विटूने नवे व्हर्जन तयार केले असल्याचे ऐकायला मिळत आहे.
View this post on Instagram
किशोरी या स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत अंजीच्या आईच्या भूमिकेत झळकत आहेत. यासोबतच त्या आता शकुची भूमिकाही साकारणार आहेत. शुभांगी यांनी मालिकेचा निरोप घेण्यामागील कारण स्पष्ट झाले नसले तरी मालिकेच्या कथेचा खालावलेला दर्जा आणि त्यांच्यावर चित्रित होणारा कमी भाग यामुळे त्यांनी ही मालिका सोडल्याचं बोललं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Song, Video viral