Home /News /entertainment /

सिद्धार्थ शुक्लाच्या घरी आलेल्या Karanvir Bohra ला कॅमेरामन म्हणाला 'गरीब'; अभिनेता संतापला, पाहा VIDEO

सिद्धार्थ शुक्लाच्या घरी आलेल्या Karanvir Bohra ला कॅमेरामन म्हणाला 'गरीब'; अभिनेता संतापला, पाहा VIDEO

संतापलेल्या अभिनेत्याने यावरुन मनस्ताप व्यक्त केला आहे.

  मुंबई, 3 सप्टेंबर : सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अंत्यदर्शनासाठी (Sidharth Shukla Funeral) टिव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार आले होते. टिव्ही कलाकारांसह अनेक बॉलिवूड कलाकारदेखील सिद्धार्थच्या अंतिम भेटीसाठी आले होते. यामध्ये करणवीर बोहरा, आसिम रियाज, वरुण धवन, विद्युत जामवाल, शहनाज गिल, रश्मी देसाई, राहुल महाजन, अली गोनी, युविका चौधरी, प्रिंस नरूला आणि अर्जुन बिजलानी सारख्या कलाकारांची नावं आहेत. यादरम्यान अभिनेता करणवीर बोहरा याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो आपल्या पत्नीसह सिद्धार्थच्या घराच्या खाली दिसत आहे. मात्र व्हिडीओमध्ये कोणीतरी केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेता पुरता चिडला. करणवीर बोहरा (Karanvir Bohra) याला या व्हिडीओबद्दल कळताच त्याने ट्विट केलं आणि लिहिलं की, 'सियाज गाडीमध्ये आले आहे, गरीब दिसतायेत', खूप वाईट वाटलं हे ऐकून. येथे 5 स्टार अपीयरन्स देण्यासाठी आले आहोता का? आम्ही एका अशा आईला भेटायला आलोय जिने आपल्या मुलाला गमावलं आहे. या व्हिडीओवर करणवीर याने माध्यमांवर राग व्यक्त केला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sujit Gupta (@sujit4.20)

  हे ही वाचा-सिद्धार्थला अखेरचं बघताना आई आणि शेहनाझला अश्रूंचा बांध रोखणं झालं कठीण सिद्धार्थ शुक्लाप्रमाणे करणवीर बोहराचं देखील टिव्ही क्षेत्रात चांगलं नाव आहे. करणवीस अभिनेत्याव्यक्तिरिक्त प्रॉड्युसर आणि डिजायनरदेखील आहे. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. चित्रपटांपेक्षाही टिव्ही मालिकांमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे. करणवीर बोहराने बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. त्यांनी 2006 मध्ये टीजे सिद्धूसोबत लग्न केलं होतं. त्यांना तीन मुलं आहेत. करणवीर बोहराने क्योंकि सास भी कभी बहू थी, कुसुम, कसोटी जिंदगी के, दिल से दी दुवा, सौभाग्यवती भव: कुबूल है आणि नागिन 2 सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bollywood actor, Mumbai, Sidharth shukla

  पुढील बातम्या