Home /News /entertainment /

Chhavi Mittal: कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान अभिनेत्रीने दाखविले शस्त्रक्रियेचे व्रण, म्हणाली....

Chhavi Mittal: कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान अभिनेत्रीने दाखविले शस्त्रक्रियेचे व्रण, म्हणाली....

कॅन्सर (Cancer) हा असा आजार आहे, ज्यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपी (Chemotherapy) सारख्या उपचार पद्धतींचा वापर करून त्यापासून सुटका मिळवता येते.

पुढे वाचा ...
     मुंबई, 25 मे-   कॅन्सर (Cancer) हा असा आजार आहे, ज्यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपी (Chemotherapy) सारख्या उपचार पद्धतींचा वापर करून त्यापासून सुटका मिळवता येते. पहिल्या दोन स्टेजनंतर मात्र, कॅन्सवर मात करणं जवळपास अशक्यच आहे. कॅन्सरच्या गोळ्या-औषधांमुळे आणि रेडिएशन थेरेपींमुळे शरीरावर विविध प्रकारचे साईड इफेक्ट होतात. कॅन्सर उपचारांदरम्यान (Cancer treatment) रुग्णाला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. अभिनेत्री छवी मित्तल (Chhavi Mittal) सध्या अशाच त्रासातून जात आहे. छवीवर गेल्या महिन्यात ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) शस्त्रक्रिया झाली आहे. आता हळुहळू ती आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. जिममध्ये जाण्यासोबतच तिने रेडिओथेरेपीही (Radiotherapy) सुरू केली आहे. अलीकडेच छवीनं आपल्या पहिल्या रेडिओथेरपी सेशनबद्दल चाहत्यांना अपडेट दिली आहे. पोटावर असलेल्या सर्जरी मार्क्सचा (Surgery Marks) एक फोटो तिनं शेअर करत किमान दोन महिने पोहता (Swimming) येणार नसल्याचं तिनं सांगितलं आहे. यामागील कारणही तिनं स्पष्ट केलं आहे. ‘कृष्ण दासी’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’ यांसारख्या टीव्ही मालिकांच्या माध्यमातून छवीला लोकप्रियता मिळाली होती. अलीकडेच तिनं एक यूट्यूब चॅनलदेखील लाँच केलं आहे. या दरम्यानच तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. त्यावर उपचार म्हणून तिला सर्जरी करावी लागली आहे. आपल्या कॅन्सर ट्रिटमेंटबद्दल ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना अपडेट्स देत आहे. छवीनं आता एक फोटोसह पोस्ट लिहिली आहे. 'रेडिओथेरपीचा पहिला दिवस अतिशय इव्हेंटफुल (Eventful) होता. मशीनमध्ये अडचणी येत होत्या. त्याची दुरुस्ती सुरू असताना मी ऑफिसमध्ये बसले. या संपूर्ण प्रक्रियेत मला फक्त थंड खोलीचा त्रास झाला. रूम अतिशय थंड होती की मी थरथर कापत होतो. मला थरथर थांबवता येत नव्हती,' असं तिनं सांगितलं आहे. छवी मित्तलनं पुढे लिहिलं आहे की, आज मी जिमला गेले आणि मग रेडिओथेरेपी करायला गेले. फोटोमध्ये तुम्हाला माझ्या पोटावरील खुणा दिसत आहेत त्या रेडिओथेरपीसाठी करण्यात आल्या आहेत. जेणेकरून योग्य ठिकाणी आणि योग्यप्रकारे रेडिओथेरपी करता येईल. संपूर्ण रेडिओथेरेपी पूर्ण होईपर्यंत मला हे असंच ठेवावं लागेल. त्यासाठी सुमारे एक महिना लागेल. त्यानंतर मी शूटिंगसाठी जाऊ शकेन. छवीला पोहण्याची आवड आहे. मात्र, तिला आणखी काही काळ स्विमिंगपासून दूर रहावं लागणार आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिनं याबाबतही माहिती दिली आहे. छवीनं आपल्या पोस्टमध्ये शेवटी लिहिलं आहे, 'खरं सांगायचं तर, मी आता पोहण्यासाठी हात वर करू शकते. परंतु, मला सुमारे दोन महिने पोहता येणार नाही. कारण क्लोरीनचा संसर्ग (Chlorine Infection) होण्याची शक्यता आहे. रेडिएशनदरम्यान पोहण्याची परवानगी नाही. पण, मी मॅनेज करेन.' यासोबतच छवी मित्तलनं कॅन्सर अपडेटचा हॅशटॅगही वापरला आहे.छवी मित्तल सातत्यानं आपल्या तब्येतीचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांबाबतही ती वेळोवेळी सांगत असते.
    First published:

    Tags: Breast cancer, Cancer, Entertainment, Tv actors

    पुढील बातम्या