मुंबईतील कोरोनाग्रस्तांना आधार देतेय ही अभिनेत्री; नर्स होऊन करते रुग्णसेवा

मुंबईतील कोरोनाग्रस्तांना आधार देतेय ही अभिनेत्री; नर्स होऊन करते रुग्णसेवा

एकीकडे लोक कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात जाण्यास घाबरत असताना ही अभिनेत्री गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्यावर मोफत उपचार करीत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : कोरोना व्हायरसनं सध्या जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या सर्वांच्या सेवेसाठी सध्या देशातील डॉक्टर्स अहोरात्र झटताना दिसत आहेत. त्यातच एका अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. ही अभिनेत्री कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे आली आहे. एकीकडे लोक कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात जाण्यास घाबरत असताना ही अभिनेत्री गेल्या 3 महिन्यांपासून त्यांच्यावर मोफत उपचार करीत आहे.

या अभिनेत्रीचं नाव आहे शिखा मल्होत्रा. कांचली या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीनं या क्षेत्रात येण्याआधी वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि नवी दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये 2014 मध्ये नर्सिंग कोर्स पूर्ण केला होता. मात्र अभिनयासाठी तिनं नर्सिंगचं करिअर अर्धवट सोडलं. पण आता कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता वॉलेंटिअर नर्स म्हणून शिखानं रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या शिखा BMC च्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर समुपदेशनाचे काम करीत आहे. कोरोना रुग्णांना शारिरीक त्रासाबरोबर मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांना मानसिक आधाराची गरज असते. रुग्णालयात नातेवाईकांनाही जाण्याची परवानगी नसल्याने रुग्णांना एकटं वाटू शकतं, अशावेळी त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी शिखा पुढे आली आहे. यावर ती म्हणते, हे देशहितासाठी माझा एक प्रकारे सहभाग आहे. शिखा गेल्या 3 महिन्यांपासून मोफत रुग्णसेवा करीत आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 4:07 PM IST

ताज्या बातम्या