Home /News /entertainment /

नोव्हेंबरमध्ये ठरवलं होतं सुशांत सिंहचं लग्न? नातेवाईकांनी केला मोठा खुलासा

नोव्हेंबरमध्ये ठरवलं होतं सुशांत सिंहचं लग्न? नातेवाईकांनी केला मोठा खुलासा

सुशांत सिंह नैराश्यात होता. त्यातही तो नियमित औषधं घेत नव्हता व मेडिटेशन करीत नव्हता अशी माहिती त्याच्या मॅनेजरने दिली आहे

    मुंबई, 14 जून : बॉलिवूडच नाही तर संपूर्ण देशाला सुशांत सिंग राजपूत याच्या  आत्महत्येमुळे धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्याच्या आत्महत्येबद्दल त्याचे क्रिएटिव्ह मॅनेजर आणि मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत सिंह काही काळापासून नैराश्याने ग्रस्त होता आणि त्याच्यावर उपचारही सुरू होते. परंतु तो नैराश्याची औषधे घेत नव्हता किंवा मेडिटेशन करीत नव्हता. दरम्यान, सुशांत सिंहच्या नातेवाईकाने त्याच्याविषयी मोठा खुलासा केला आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुशांत सिंह याचं लग्न (Sushant Singh Rajput Marriage) होणार असल्याचे अभिनेत्याच्या नातेवाईकाने सांगितले आहे. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना सुशांत सिंह राजपूत याच्या नातेवाईकाने खुलासा केला आहे की, यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुशांत लग्न करणार होता. त्याच्या घरात  लग्नाची तयारीही सुरु झाली होती. मात्र तो कोणाशी लग्न करणार आहे याचा खुलासा त्यांनी केला नाही. परंतु यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचे लग्न होणार असल्याची पुष्टी केली आहे. आज दुपारी सुशांतने आपल्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी त्याचे मित्रही आले होते. मित्रांसोबत दिवस घालवण्यानंतर दुपारी तो आपल्या खोलीत गेला, तो परत आलाच नाही. घरातील नोकराला सुशांतने गळफास घेतल्याचं आढळून आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सुशांतच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी सुशांतचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात नैराश्यातून सुशांतने आत्महत्या केली, असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी सुशांतचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. गेल्या काही तासांत सुशांत कुणासोबत बोलला, कुणाला त्याने कोणते कोणते मॅसेज केले, याचा तपास सध्या सुरू आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होता. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागद पत्र आढळून आली आहे. हे वाचा -सुशांतच्या आई आणि बहिणीचं आधीच झालं होतं निधन, मोलकरणीने दिली धक्कादायक माहिती
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sucide, Sushant sing rajput

    पुढील बातम्या