The Accidental Prime Minister Trailer यु ट्युबवरून गायब, सर्च केल्यावर दिसतो 'हा' व्हिडिओ

The Accidental Prime Minister Trailer यु ट्युबवरून गायब, सर्च केल्यावर दिसतो 'हा' व्हिडिओ

The Accidental Prime Minister सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सगळीकडे वाद सुरू झाला. आता बातमी अशी आहे की, हा ट्रेलर यु ट्युबवर शोधूनही सापडत नाहीय.

  • Share this:

मुंबई, 02 जानेवारी : The Accidental Prime Minister सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सगळीकडे वाद सुरू झाला. आता बातमी अशी आहे की, हा ट्रेलर यु ट्युबवर शोधूनही सापडत नाहीय. याची तक्रार अभिनेता अनुपम खेर यांनी यु ट्युबकडे ट्विटरवरून केलीय.

अनुपम खेर यांनी म्हटलंय, 'देशाच्या अनेक भागात यु ट्युबवर The Accidental Prime Minister trailer टाइप केलं तरी मिळत नाहीय. सर्च करून काही दिसत नाही. तर काही ठिकाणी  50व्या स्थानावर ट्रेलर आहे. आम्ही मंगळवारपर्यंत नंबर 1 ट्रेंडिंग होतो. यु ट्युब प्लीज मदत करा.'

अनुपम खेर यांनी लोकांनी पाठवलेला स्क्रीन शाॅटही ट्विट केलाय.मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारीत ‘दि अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आहे. सिनेमात मनमोहन यांची भूमिका अनुपन खेर साकारत आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात देशासाठी केलेल्या राजकीय आणि आर्थिक कामाचं दर्शन सिनेमात आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आलेल्या सर्व अडचणी आणि देशासाठी करावा लागलेला सामना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन विजय गुट्टे यांनी केलं आहे. येत्या 11 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मलायकाच्या खांद्यावर अर्जुनचा हात, पार्टीतले PHOTOS व्हायरल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या