THE ACCIDENTAL PRIME MINISTER : काँग्रेस कार्यकर्त्यांनी या राज्यात बंद पाडला शो

THE ACCIDENTAL PRIME MINISTER : काँग्रेस कार्यकर्त्यांनी या राज्यात बंद पाडला शो

अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरचे शो बंद पाडल्याच्या प्रकारावर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे

  • Share this:

कोलकत्ता, 13 जानेवारी : युपीए सरकारच्या काळात 10 वर्ष पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरील द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका साकारलेल्या या चित्रपटाने वादही निर्माण झाला आहे. कोलकत्त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरचं स्क्रिनिंग बंद पाडलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे हातात घेऊन निदर्शने केली आहेत.

कोलत्त्यातील क्वेस्ट मॉलमध्ये प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्याच्या वेळेलाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. काँग्रेस कार्यकर्त्यांना दावा केला आहे की, या चित्रपटातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान होइल असे चित्रण केलं आहे. त्यामुळं आम्ही हे स्क्रिनिंग बंद पाडत आहोत. हा चित्रपट कोणत्याही ठिकाणी चालू देणार नसल्याचा इशाराही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मनमोहन सिंग यांचं चुकीचं चित्र रंगवलं असल्याचा आरोप करत महाराष्ट्र युवक काँग्रेसनं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवण्याची मागणी केली होती. अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरचे शो बंद पाडल्याच्या प्रकारावर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. शो बंद पाडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांटे माध्यम सल्लागार संजय बारू यांनी लिहलेल्या पुस्तकावर आधारीत आहे.

दरम्यान, हा सिनेमा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या या नावाच्या पुस्तकावरच आधारित आहे. काँग्रेसने हे सर्व भाजपने घडवून आणल्याचं म्हटलं आहे. या सर्व विवादात सिनेमाच्या प्रदर्शनावरही प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. यावर प्रमुख भूमिकेत असलेल्या अनुपम खेर यांनी मौन तोडत प्रत्येक आरोपांचं खंडन केलं आहे.

खेर म्हणाले की, ‘देशातील राजकारणातील ही सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जेव्हा मला युवा काँग्रेस नेत्याचं पत्र मिळालं, तेव्हा मी दुर्लक्ष केलं. मात्र यावर आता वाद झाला आहे. सेंसर बोर्डाने परवानगी देण्याआधी आम्ही काहीच केलं नाही. पण, आता हा सिनेमा प्रदर्शित होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.’

ट्रम्प यांची वादग्रस्त ट्वीट छापली चपलांवर, गड्याने महिन्याला कमावले 20 लाख

First published: January 13, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading