• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • IFFI 2021: आजपासून गोव्यात सुरु होणार 52 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

IFFI 2021: आजपासून गोव्यात सुरु होणार 52 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival) शनिवारपासून गोव्यात (Goa) सुरू होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर- आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव  (International Film Festival)  शनिवारपासून गोव्यात  (Goa)   सुरू होत आहे. आजपासून 8 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात OTT प्लॅटफॉर्म प्रथमच सहभागी होत आहेत. 28 नोव्हेंबरपर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे. हॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक इस्तवान स्झाबो आणि मार्टिन स्कोर्से यांना या महोत्सवात सत्यजित रे लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्याचवेळी हेमा मालिनी (Hema Malini)  आणि गीतकार प्रसून जोशी   (Prasun Joshi)  यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कारने सन्मानित केलं जाणार आहे. हा 52 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. OTT प्लॅटफॉर्म प्रथमच महोत्सवात सहभागी होणार आहेत, ज्यासाठी Netflix, Amazon Prime, Zee5, Voot आणि Sony Liv सारख्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्मना आमंत्रित करण्यात आले आहे. गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून (DFF) याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच दशकांपासून इफ्फी सुरू आहे. ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांचे अनेक चित्रपट दाखवले जाणार आहेत. EFFI आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माता संघाशी संलग्न आहे. दरवर्षी चित्रपट महोत्सवादरम्यान भारतातील आणि जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले जातात. यादरम्यान, अकादमी पुरस्कार, 2022 साठी भारताचा प्रवेश, भारतीय पॅनोरमा विभागात तमिळ चित्रपट 'कोझंगल' प्रदर्शित केला जाईल.
  Published by:Aiman Desai
  First published: